E-Bus (File Photo) Sakal
नाशिक

Nashik E Bus : ‘पीएम ई बस’ योजनेच्या माध्यमातून 100 इलेक्ट्रिक बस

सकाळ वृत्तसेवा

Nashik E Bus : ‘एन-कॅप’ योजनेंतर्गत नाशिक महापालिकेने पन्नास बस खरेदी करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आता केंद्र शासनाच्या पीएम ई- बस योजनेच्या माध्यमातून शंभर इलेक्ट्रिक बसचे नियोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर महापालिकेला ‘ग्रॉस टू कास्ट’ तत्त्वावर बस चालविता येणार आहे. (Planning of 100 electric buses through PM eBus Yojana of Central Govt nashik news)

महापालिकेकडून एसटी महामंडळाकडून बससेवा ताब्यात घेऊन ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ तत्त्वावर बससेवा सुरू करण्यात आली. दोनशे सीएनजी, पन्नास डिझेल बस आतापर्यंत रस्त्यावर धावत आहे. महापालिकेने एन-कॅप योजनेंतर्गत पन्नास इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तत्काळ बस उपलब्ध होवू शकतं नसल्याने सदर निधी रस्ते विकासाच्या कामांवर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारकडून बस

केंद्र सरकारने राज्यातील २३ महापालिकांना इलेक्ट्रिक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही प्रतिकिलोमीटर मागे बावीस रुपये अनुदान दिले जाणार आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, डेपो व अन्य व्यवस्थापनाचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने यासंदर्भात सर्वेक्षण केले. बस डेपो जागा, बस डेपो क्षमता, चार्जिंग स्टेशन, विजेची उपलब्धता आदी बाबी तपासण्यात आल्या. महापालिकेचे नोडल अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता बाजीराव माळी यांची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे.

"केंद्र सरकारच्या पीएम बस योजनेतून शंभर इलेक्ट्रिक बस उपलब्ध होणार आहे. बसचे व्यवस्थापन, डेपो, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची तयारी यासंदर्भात सल्लागार संस्थेच्या माध्यमातून अहवाल सादर केला जाणार आहे." - बाजीराव माळी कार्यकारी अभियंता, यांत्रिक विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DSK Case: डीएसके प्रकरणात ठेवीदारांना मोठा दिलासा; ५७२ कोटींच्या मालमत्ता लिलावाच्या अर्जावर तीन महिन्यांत निर्णय

IIT Bombay Exam: आयआयटी बॉम्बे परीक्षेत गैरप्रकार? कॉपीसाठी ७०० रूपयांच्या मोबाईलचा वापर, पोलिसांकडून तपास सुरू

इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्याच्या मुलाला विधानसभेचं तिकीट, पंजाब निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, एक जण जखमी

Vaibhav Sooryavanshi: वय अवघं १५, संपत्ती कोट्यवधींच्या घरात! वैभव सूर्यवंशीसोबत जोडले गेले ‘हे’ ५ मोठे ब्रँड; कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT