Shiv Sena's Shinde group secretary Bhausaheb Chaudhary along with office bearers speaking at a meeting held at the Government Rest House in view of the upcoming elections. esakal
नाशिक

Shivsena Shinde Group: शिंदे गटाकडून ‘मिशन 48’चे नियोजन सुरू; शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये सहभागी शिवसेनेच्या शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन ४८’ची घोषणा केली असून, निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिशनचे नियोजन करण्यात आल्याने भाजपकडून मात्र या विषयावर चुप्पी साधण्यात आली आहे. (Planning of Mission 48 started by Shivsena Shinde Group Meeting of office bearers at Government Rest House nashik)

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व मिझोराम या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले. लोकसभेची सेमीफायनल जिंकल्याने विश्वास दुणावलेल्या भाजपने लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे.

राज्यातील ४८ जागांपैकी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या, हे अद्याप निश्चित झाले नसताना शिवसेनेच्या शिंदे गटाने ४८ जागांवर लक्ष केंद्रित केल्याची घोषणा केली आहे.

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख जयंत साठे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, लोकसभा संघटक योगेश मस्के, युवा सेना विस्तारक योगेश बेलदार, महिला आघाडी जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुवर्णा मटाले, महानगर संघटक अस्मिता देशमाने आदी या वेळी उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रामुख्याने नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य, देवळाली, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर विधानसभेच्या शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांच्या सोबत पुढील निवडणुकांच्या संदर्भात शिवसेना नाशिक जिल्ह्याची तयारी कुठपर्यंत आली आहे,

पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पूर्ण झाल्या आहेत का, बूथ प्रमुखांची नेमणूक झाली आहे का, शिवसेनेच्या तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या सर्व जनहिताची कामे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचते, का यावर चर्चा करण्यात आली.

चौधरी-साठे यांचा सत्कार

शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांची शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी निवड झाली तर नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख जयंत साठे यांची नाशिक लोकसभा निरीक्षकपदी निवड झाली. बुधवारी (ता.६) शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर – जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून प्रत्यक्ष सदस्य नोंदणी अर्ज भरून देणे किंवा ७७०३०७७०३० या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन येणाऱ्या लिंकवरील फॉर्म भरून पक्षाचे सदस्यत्व घेणे किंवा क्यूआर कोड स्कॅन करून फॉर्म भरून त्यानंतर ओळखपत्र डाऊनलोड करून सदस्यत्व, घेणे असे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT