booster dose latest marathi news
booster dose latest marathi news esakal
नाशिक

12 लाख 61 हजार नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात बूस्टर डोस (Booster Dose) म्हणजेच लशीचा तिसरा डोस सर्व नागरिकांना देण्यास १५ जुलैपासून सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील १२ लाख ६१ हजार ३५७ नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन जिल्हा परिषद (ZP) आरोग्य विभागाने केले आहे.

त्यासाठी ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील ४५० केंद्रांवर हे बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत दहा हजार नागरिकांना बूस्टर डोस दिल्याची नोंद झाली आहे. (Planning to give booster dose to 12 lakh 61 thousand citizens nashik Latest Marathi News)

बूस्टर डोस यापूर्वी केवळ आरोग्यसेवक, फ्रंटलाइन सेवक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांसह गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठांना दिला जात होता. बहुतांश फ्रंटलाइन सेवक आणि इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

आता शासनाने बूस्टर डोस ऐच्छिक ठेवत सर्व नागरिकांना खुले केला आहे. ज्यांना आवश्यक आहे, अशा कुणाही १८ वर्षांवरील नागरिकांना हा डोस उपलब्ध केला आहे. यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ४५० केंद्रांवर हा डोस खुला केला.

जिल्ह्यात बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या १२ लाख ६१ हजार ३५७ इतकी आहे. यात कोव्हॅक्सिन डोस असणाऱ्यांची संख्या दोन लाख १२ हजार ७८२ आहे, तर १० लाख ४८ हजार ५७५ कोव्हिशील्ड बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या आहे.

तालुकानिहाय बूस्टर घेणाऱ्यांची संख्या कळवण (४० हजार २८४), नाशिक (७४ हजार ९७५), देवळा (३३ हजार २२९), नांदगाव (३८ हजार ९७१), मालेगाव (५९ हजार १९७), सटाणा (६९ हजार ८५९), येवला (४० हजार २९७), चांदवड (३७ हजार ७९७), दिंडोरी (६४ हजार ६६५), सुरगाणा (२० हजार ९४६), त्र्यंबकेश्वर (२९ हजार ८), इगतपुरी (५६ हजार ७०३), निफाड (एक लाख ४४ हजार ४३१), सिन्नर (७२ हजार ८५२), पेठ (१९ हजार ४३४), नाशिक महापालिका क्षेत्र (चार लाख ६३ हजार २४१), मालेगाव महापालिका क्षेत्र (३४ हजार ८३८).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

RCB vs CSK Security Breach : आरसीबी-चेन्नई सामन्यात सुरक्षा भेदण्याचं प्लॅनिंग? सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल

Video: काय बोलावं आता! भर रस्त्यात नाचली 'मंजूलिका'; व्हिडिओ होतोय व्हायरल

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT