Onion Crop esakal
नाशिक

Nashik Kharif Sowing: लाल कांद्याची लागवड रखडली! खरिपाची 20, लेट खरिपाची 35 हजार हेक्टरवर लागवड

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kharif Sowing: पावसाळा सुरू होऊन अडीच महिने संपले, तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरवरील खरीप व लेटखरीप लाल कांद्याची लागवड रखडली आहे.

याचा फटका बसून कांद्याचे दर वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. (Planting of red onion stopped Cultivation of Kharipachi 20 Late Kharipachi 35 thousand hectares nashik)

लाल कांद्याला जिल्ह्यात बोलीभाषेत पोळ कांदा म्हटले जाते. प्रामुख्याने हा कांदा चांदवड, मालेगाव, मनमाड, नांदगाव व येवला तालुक्यांमध्ये घेतला जातो. जूनमध्ये दोन पावसांनंतर विहिरींना पाणी उतरल्यावर लाल कांद्याचे रोप टाकले जाते.

महिनाभराने हे रोप लागवडीयोग्य झाल्यावर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये लाल कांद्याची लागवड होते. जिल्ह्यात साधारणत: २० हजार हेक्टरवर याची लागवड होते. चांदवडच्या परिसरात हा कांदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो.

तीन ते चार महिन्यांनी दिवाळीच्या सुमारास हा कांदा बाजारात दाखल होतो. लेट खरीप कांदा हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत लावला जातो. जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर त्याची लागवड होते.

पण, या भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे लागवडीयोग्य तयार झालेली कांद्याची रोपे पडून आहेत. शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उन्हाळ कांदा खाणार भाव

लाल कांद्याची लागवड रखडल्याने उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी चार महिन्यांपासून चाळींमध्ये साठवून ठेवलेला कांदा आता विक्रीसाठी बाजार समितीत दाखल होत आहे. उन्हाळ कांदा अजून काही दिवस तेजीत राहील, असा अंदाज वर्तविला जातो.

कर्नाटकच्या कांद्याकडे लक्ष

महाराष्ट्रासह कर्नाटकमध्येही खरीप कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कर्नाटकमध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने तिकडचा कांदा सोलापूर जिल्ह्यात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. हा कांदा बाजारात दाखल झाल्यास त्यांनाही चांगला भाव मिळू शकतो.

नाशिक जिल्ह्यात येत्या १५ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर कांद्याचे रोप खराब होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT