East division squad taking punitive action against traders using restrictive plastic bags esakal
नाशिक

Plastic Ban : एका दिवसात 75 हजारांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : पूर्व विभागातील प्लॅस्टिक पिशव्यांचा, तसेच सिंगल युज प्लॅस्टिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एका दिवसात सुमारे ७५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. (Plastic Ban 75 thousand fine collected in one day Nashik Latest Marathi News)

विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विभागात प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्या आणि सिंगल युज प्लॅस्टिक वापर, साठवणूक, विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. घनकचरा विभागाच्या विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून कारवाई केली जात आहे. मंगळवारी (ता. १८) विविध भागात कारवाई करण्यात आली. एका दिवसात १४ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

त्यांच्याकडून ७५ हजार दंड वसुल केला. विभागीय स्वच्छता निरिक्षक सुनील सिरसाठ, स्वच्छता निरिक्षक अजयकुमार मोरे, स्वच्छता मुकादम सचिन मांडे, रवी वाघमारे, गौतम पवार, बाळू भोई पथकाने कारवाई केली. एका वेळेस दंडात्मक कारवाई करूनही दुसऱ्या वेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना दहा हजार, तर कारवाईची पहिली वेळ असलेल्यांना ५ हजारांचा दंड करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT