potholes 
नाशिक

Ganeshotsav 2023 : बाप्पाचा प्रवास खड्ड्यातूनच! महिना उलटूनही खड्डे बुजविण्याचा प्रस्ताव अधांतरी

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी १०४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरही महिना उलटत आला तरी प्रस्ताव मंजूर होत नाही. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात मंडळांना बाप्पाचा प्रवास खड्ड्यातूनच करावा लागणार आहे.

गेला तीन ते चार वर्षात नाशिक महापालिकेकडून खड्ड्यावर बाराशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला, मात्र तरीही खड्ड्यांची अवस्था सुधारलेली नाही.

या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी पहिल्या एक-दोन पावसामध्येच शहरातील रस्ते धुवून निघाले. (plugging pothole proposal is not approved till now nashik news)

रस्त्यांवरील खड्ड्यांची दखल राज्य शासनानेदेखील घेतली. पालकमंत्री दादा भुसे यांनी शहरातील खड्ड्यांची पाहणी करून महापालिकेला आठ दिवसांचा खड्डे बुजविण्यासाठी अल्टिमेटम दिला. दरम्यान खड्डे बुजविण्यासाठी १० ऑगस्टला स्थायी समितीने १०४ कोटी ३३ लाख रुपयांच्या खड्डे दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली.

स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर नगरसचिव विभागाकडून आयुक्तांना अद्यापपर्यंत ठरावच प्राप्त झालेला नाही त्यामुळे यंदा गणेशोत्सवात गणपती बाप्पांचा प्रवास खड्ड्यातूनच होणार असल्याची मिस्कील टिपणी केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक पश्चिम विभागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी २० कोटी ६४ लाख रुपये, सिडको विभागात २० कोटी दहा लाख रुपये, नाशिक रोड विभागात १८ कोटी ९३ लाख रुपये, पूर्व विभागात १४ कोटी ९० लाख रुपये, पंचवटी विभागात १४ कोटी ५० लाख रुपये, तर सातपूर विभागात १५ कोटी २३ लाख रुपये रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी खर्च केले जाणार आहे

प्रस्ताव न येण्यामागचे गणित काय?

१० ऑगस्टला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर आठ दिवसात महासभेवर प्रस्ताव मंजूर होऊन ठेकेदारांना कार्यारंभ आदेश मिळणे अपेक्षित होते. मात्र महिना उलटला तरी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठीचा प्रस्ताव सादर न झाल्याने मंजूर प्रस्तावाला अंतिम स्वरूप न देण्यामागचे गणित काय याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT