नाशिक

पीएम बससेवेचे अनुदान रखडणार

CD
टूडे साठी --------------- पीएम बससेवेचे अनुदान रखडणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पीएम ई-बस सेवेसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक साहाय्य वितरणाला ब्रेक लागला आहे. निधी वितरणासाठी आवश्यक असलेली अनिवार्य कागदपत्रे महापालिकेने वेळेत सादर न केल्याने केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने नाशिक महापालिकेसह महाराष्ट्रातील सहा महापालिकांना सात दिवसांत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे स्पष्ट निर्देश देत मंत्रालयाने स्मरणपत्र जारी केले आहे. मंत्रालयाने यापूर्वी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी याच संदर्भात पत्र पाठवून कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र महिनाभर उलटूनही संबंधित शहरांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्राने पुन्हा स्मरणपत्र पाठविले. पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत बस संचालनासाठी आगाऊ आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी काही अनिवार्य अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यात एस्क्रो करार, बसच्या व्यावसायिक संचालनाच्या तारखेचा पुरावा, एस्क्रो खात्याचा तपशील व बँकेचे समर्थनपत्र, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर एस्क्रो खाते मॅप केल्याचा स्क्रीनशॉट आणि डायरेक्ट डेबिट मेकॅनिझम यासंबंधीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे अद्याप मंत्रालयाला प्राप्त झालेली नसल्याने संबंधित शहरांमध्ये बससेवा सुरू झाली असली, तरी कागदपत्रे मिळेपर्यंत आगाऊ निधी वितरणाची प्रक्रिया पुढे नेता येणार नसल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे नाशिकमधील ई-बस सेवेसाठी केंद्राच्या साहाय्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील ठाणे, नागपूर, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक आणि कोल्हापूर या सहा महापालिकांचा उल्लेख आहे. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retaintion: स्टार्क, दीपक चाहर, ट्रॅव्हिस हेड बाहेर... १० संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज अन् रिटेन, पाहा संपूर्ण लिस्ट

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल खून खटल्याची सुनावणी चार डिसेंबरला

महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नियम बदलले! आता १२ वर्षांखालील मुलांना एकट्यानं प्रवेश बंद; सोसायट्यांची जबाबदारी वाढली

Paradh News : मोबाईल उघडल्या नंतरच महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या आत्महत्याचे कोढे उलगडणार.....? चार दिवसानंतर ही महाराजांच्या आत्महत्याचे गूढ कायम

Amravati News : नल-दमयंती सागर झाला अबोल! पक्षिमित्रांना लागली चिंता, दुष्काळाचे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT