PM Modi Kalaram Mandir Video Sakal
नाशिक

PM Modi Kalaram Mandir Video : मोदींनी केली काळाराम मंदिराची साफसफाई, समस्त देशवासीयांना केला 'हा' आग्रह...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१२) नाशिक शहरातील पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली.

रोहित कणसे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१२) नाशिक शहरातील पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली. श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतांना ते नतमस्‍तक झाले. यावेळी पंतप्रधान मोदींच्‍या हस्‍ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती देखील करण्यात आली. यानंतर मोदींची जाहीर सभेत देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम चालवण्याचे अवाहन देखील केले आहे. (PM Modi In Kalaram Mandir Nashik Visit)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा हा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. हा दिवस त्या महापुरुषास समर्थित आहे,ज्याने गुलामीच्या काळात भारताला नव्या उर्जेने भरून टाकलं होतं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी तरुणांसोबत नाशिकमध्ये असणं माझं भाग्य आहे असेही मोदी म्हणाले. आजच भारताच्या नारीशक्तीच्या प्रतिक राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे.

जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान असल्याचेही मोदी म्हणाले. भारतातील अनेक महान व्यक्तींचा संबंध महाराष्ट्राशी आहे, हा फक्त योगायोग नसून ही या पुण्यभूमी आणि वीरभूमीचा प्रभाव असल्याचेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.

याच भूमीने राजमाता जिजाऊ, देवी अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबोडकर यासारख्या महान महिला दिल्या. याच धर्तीने देशाला लोकमान्य टिळक, वीर सावरकर, आनंद कन्हेरे, चाफेकर बंधू यांसारखे नेत दिले आहेत. नाशिकच्या पंचवटीत प्रभू श्रीरामांनी खूप वेळ घालवला, या भूमीला मी प्रणाम करतो असेही मोदी म्हणाले.

मी अवाहन केलं होतं की, २२ जानेवारी पर्यंत आपण सगळ्यांनी देशातील तीर्थक्षेत्र, मंदिरांची स्वच्छता करावी. यासाठी अभियान सुरू करावे. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचे तसेच मदिर परिसरात साफसफाई करण्याचे सौभाग्य मिळाले. मी देशवासीयांना पुन्हा आग्रह करेल की, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरात आणि तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता अभियान चालवा आणि श्रमदान करा असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

व्हिडीओ आला समोर

दरम्यान मोदी यांनी काळाराम मंदिरात स्वच्छता केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी स्वतः स्वच्छता करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT