Narendra Modi watching his replica of Prime Minister Modi being woven on the charkha at Paithani Shela. esakal
नाशिक

Nashik : मूकबधिर दिव्यांगाची पैठणी पाहून PM मोदी भारावले! राष्ट्रीय हातमागदिनी दिल्लीत कापसे पैठणीचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पैठणीचा शेला पाहिल्यावर. हा शेला कोणी बनविला? किती दिवस लागले? तुम्ही कुठले आणि नाव काय, असे प्रश्न विचारले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी.

येथील कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे यांच्याकडून देखना शेला मूकबधिर दिव्यांग मुलांनी बनविल्याचे समजतात, पंतप्रधान मोदी अवाक झाले अन्‌ येथील कापसे पैठणीच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. (PM Modi overwhelmed by performance of deaf and mute disabled Appreciation of kapse Paithani in Delhi on National Handloom Day Nashik)

येवल्यातील विणकारांच्या कलेला प्रेरणादायी ठरणाऱ्या या भेटीसाठी निमित्त ठरले ते राष्ट्रीय हातमाग दिनी दिल्लीत भरलेल्या प्रदर्शनाचे. चरख्यावर मोदी विनकाम करतानाची पैठणी शेल्याची फ्रेम बाळासाहेब कापसे यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिली.

दिल्लीतील क्रांती मैदानावर देशातील हातमागावर विणलेल्या साड्यांचे प्रदर्शन भरविले होते. प्रदर्शनात येवल्याच्या पैठणीच्या कापसे यांच्या स्टॉलला पंतप्रधान मोदी यांनी भेट देत पाहणी केली.

कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे आणि त्यांची कन्या सौम्या उपस्थित होती. पंतप्रधान मोदी चरख्यावर विणकाम करीत असतानाची प्रतिकृती असलेला शेला प्रदर्शनात ठेवला होता.

ही प्रतिकृती पाहून पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब कापसे यांना काही प्रश्न विचारले. त्याची उत्तरे देत असताना, सुमारे दोनशे ते अडीचशे दिव्यांग मुले विनकाम करीत असल्याचे ऐकून अवाक झालेल्या मोदींनी कापसेच्या पाठीवर थाप मारत कौतुक केले.

शेला येवल्यातील वडगाव येथील कापसे प्रशिक्षण केंद्रातील मूकबधिर विद्यार्थ्यांनी ५० दिवसांत बनविल्याची माहिती कापसे यांनी दिली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे, दर्शना जरदोष आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ओल्ड कल्चरमध्येही अंबानींकडून कौतुक

मुंबईच्या बीकेसीमधील जिओ संकुलात अंबानी कुटुंबीयाने भरविलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनातही कापसे पैठणीला निमंत्रित केले होते.

कापसे पैठणीच्या स्टॉलला नीता अंबानी यांनी भेट देत येवल्याच्या पैठणीचे कौतुक केले होते. त्यानंतर आता मोदींनी कौतुक केल्याने कापसेसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट अन्‌ त्यांनी येवला पैठणीचे केलेले कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. त्यांच्यामुळे पंतप्रधान कौशल्य केंद्र येवल्याला मिळाले. त्यात दिव्यांग मुले विणकाम शिकत असून, त्यांना रोजगार मिळाला आहे. याच मुलांच्या हस्ते बनवलेली कलाकृती मोदी यांना भेट दिली. त्यांनाही आनंद झाला. या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केल्याने आनंद झाला."-बाळासाहेब कापसे, पैठणी उद्योजक, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT