dr Bharti Pawar
dr Bharti Pawar Google
नाशिक

भारती पवार ठरल्या जिल्ह्यातील पहिल्या महिला केंद्रीय मंत्री

कुणाल संत

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. नाशिक जिल्हा परिषद सदस्य ते पहिल्याच खासदारकीच्या टर्ममध्ये केंद्रात मंत्रीपदी मिळविणाऱ्या खासदार डॉ. भारती पवार या जिल्ह्यातील पहिल्या एकमेव महिला खासदार बनल्या आहेत. केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने पवारांच्या समथर्कांमध्ये उत्साह आहे. (pm-narendra-modi-cabinet-expansion-2021-dr-bharti-pawar-appointed-minister-of-stat)


अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून डॉ. भारती पवार ह्या २०१९ च्या लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. एक हुशार महिला खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. खासदारकीच्या दोन वर्षाच्या कालावधीतच त्यांनी संसदेत आपली चूणूक दाखविली वेगळी छाप पाडली आहे.
खासदार डॉ. भारती पवार ह्या माजीमंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या भारती पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर २०१२ मध्ये उमराणे गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित विजय मिळविला होता. डॉक्टर असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील कुपोषणाचा मुद्दासह आरोग्य व्यवस्था सुधाराविण्यासाठी मोठे काम करत वेळेप्रसंगी जिल्हा परिषद प्रशासनास चांगलेच धारेवर धरले होते. आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे व संघटनाच्या कौशल्यावर त्यांनी जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले होते.


अभ्यासू व्यक्तीमत्वामुळे त्यांना २०१४ साली लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खासदारकीची उमेदवारी देण्यात आली. मात्र या निवडणूकीत त्यांना खासदार हरिषचंद्र चव्हाण यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पराभवामुळे डॉ". भारती पवार यांनी खचून न जाता आपले काम सुरुच ठेवले. यामुळे पक्षात त्यांना चांगलाच मान दिला जात होता. २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत त्या पुन्हा मानूर (ता.कळवण) मधून निवडून येत दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत आल्या. याठिकाणी देखील त्यांनी आपले कामाचा धडाका सुरूच ठेवला.


ऐनवेळी भाजपात प्रवेश

राजकीय पाश्‍र्वभूमीवर आणि कार्यकर्त्यांच्या घट्ट जाळ्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या खासदारकीसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. त्यासाठी त्यांनी मतदार संघ पिंजून काढत तशी तयारीही केली होती. मात्र ऐनवेळी डॉ. भारती पवार यांचे खासदारकीचे तिकिट पक्षाने कापत शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार धनराज महाले यांना तिकिट देण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या डॉ.भारती पवार यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश करत तिकिट मिळविले आणि धनराज महाले यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला.

पहिल्याच संधीत केंद्रात राज्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यात अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. यामध्ये दिंडोरीच्या खासदार डॉ.भारती पवार यांना देखील मोदींच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळणार आहे. केंद्रात मंत्रीपदी वर्णी'लागल्याने खासदार डॉ. भारती पवार ह्या जिल्ह्यातील पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत तर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दुसऱ्यांदा जिल्ह्यास केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद; महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT