नाशिक

लोक कल्याण मेळावा

CD
धुळे टुडे २ साठी मेन... --- फोटो- NSK26H31825 धुळे ः पीएम स्वनिधी योजनेतील लाभार्थी व पथविक्रेत्यांसाठी महापालिकेत गुरुवारी आयोजित लोककल्याण मेळाव्याला उपस्थित लाभार्थी, पथविक्रेते व अधिकारी-कर्मचारी. --- धुळे महापालिकेत लोककल्याण मेळावा पीएम स्वनिधी योजनेंतर्गत आयोजन; अडचणी घेतल्या जाणून, लाभार्थ्यांना धनादेशवाटप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ ः पीएम स्वनिधी योजनेतील लाभार्थी, तसेच शहरातील पथविक्रेत्यांसाठी गुरुवारी (ता. ८) दुपारी चारला महापालिकेतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात लोककल्याण मेळावा झाला. या मेळाव्यात पीएम स्वनिधी योजनेंतर्गत मंजूर कर्ज प्रस्तावांच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. तसेच प्रलंबित कर्ज प्रकरणांच्या अर्जदारांच्या अडीअडचणी अधिकाऱ्यांनी जाणून घेत पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने आश्वासन दिले. महापौर मायादेवी परदेशी, महिला बालकल्याण समिती सभापती उज्ज्वला ठाकरे, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, लीड बँकेचे व्यवस्थापक मयूर ठेले, समाज विकास अधिकारी मीना सातभाई यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील नवीन पथविक्रेत्यांपर्यंत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ पोहोचविणे, योजनेबाबत जनजागृती करणे., प्रथम, द्वितीय व तृतीय टप्प्यातील कर्जासाठी पात्र पथविक्रेत्यांना बँकांकडे अर्ज करण्यास प्रोत्साहित करणे, तसेच कर्ज मंजुरी व वितरण प्रक्रियेसाठी मनपा, बँका आणि लाभार्थ्यांमध्ये समन्वय साधण्याच्या अनुषंगाने हा मेळावा झाला. मेळाव्यात पीएम स्वनिधी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कर्ज प्रस्तावांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. ४० ते ४५ लाभार्थ्यांची प्रकरणे या योजनेंतर्गत मंजूर असल्याची माहिती समाज विकास अधिकारी सातभाई यांनी दिली. तसेच योजनेंतर्गत दुसऱ्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या पात्र पथविक्रेत्यांना बँकांच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहारांसाठी क्यूआर कोड, यूपीआय व डिजिटल ऑन-बोर्डिंग सुविधेचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. अडचणी सोडविणार मेळाव्यात विविध बँकांकडे कर्जासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या अडीअडचणी उपस्थित अधिकाऱ्यांनी समजून घेतल्या. या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीचे आश्वासन या वेळी दिले. मेळाव्यात उपस्थितांना प्रधानमंत्री स्वनिधी योजना-२.० विषयी माहिती देण्यात आली. या योजनेची उद्दीष्टे, पथविक्रेत्यांसाठी उपलब्ध सुविधा व योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया याविषयी जागृती करण्यात आली. या लोककल्याण मेळाव्याला शहरातील पथविक्रेते उपस्थित होते. --- चौकट योजनेचे उद्दिष्ट असे पीएम स्वनिधी योजना ही केंद्र सरकारची फेरीवाले आणि लहान व्यावसायिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूक्ष्म-कर्ज योजना आहे. कोरोना साथीच्या काळात प्रभावित झालेल्या फेरीवाल्यांना आणि लहान व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय पुनरुज्जीवित करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी विनातारण (बिना गॅरंटी) खेळते भांडवल उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

SCROLL FOR NEXT