नाशिक

पोक्सो कायद्यावर जनजागृती

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H34811 धुळे : देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर. --- पोक्सो, सोशल मिडिया वापरावर मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन --- देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ : श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला अंतर्गत तक्रार निवारण समिती व उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सुरक्षित बचपन अभियानांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या वतीने पोक्सो व अन्य संबंधित स्त्री संरक्षण विषयक कायदे व सायबर क्राईमवर जगजागृती कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाला अति. सत्र न्यायाधीश ए. ए. भोसले, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एम. जी. सराफ, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी, ॲड. श्रीमती बी. एस. वाघ, प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील, ॲप्लाइड सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. अभिजित मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात न्या. भोसले यांनी सोशल मिडियाचा वापर व वाढती सायबर गुन्हेगारी यावर मार्गदर्शन केले. ॲड. श्रीमती वाघ यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करून सोशल मिडियाचा माफक वापर करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष देण्याचे आवाहन करताना सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीपासून स्वतः ला दूर ठेवण्याचे आवाहन केले. न्या. सराफ यांनी पोक्सो कायदा, त्यातील तरतुदी, विद्यार्थ्यांनी या संदर्भात घ्यायची काळजी, सोशल मिडिया वापरताना घ्यायची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. न्या. कुलकर्णी यांनी बाललैंगिक गुन्हेगारी, नालसा, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाद्वारे दिला जाणारे मोफत कायदेविषयक सहकार्य यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, प्रारंभी प्राचार्य डॉ. पाटील यांनी अतिथींचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या महिला अंतर्गत तक्रार निवारण समिती समन्वयक प्रा. मेधा जोशी, सचिव प्रा. डॉ. संगीता राजपूत उपस्थित होते. प्रा. दीपमाला पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT