NSK26H31346
जळगाव : व. वा. वाचनालयात प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी कार्यशाळेचे उद्घाटन करताना मान्यवर.
-----
कवितेची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत
पोचविण्याचे काम शिक्षकांनी करावे
प्रा. डॉ. मनीष जोशी : प्राथमिक शिक्षकांसाठी कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : कवितेची परंपरा पुढच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्राथमिक शिक्षकांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. मनीष जोशी यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
येथील व. वा. जिल्हा वाचनालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागातर्फे इयत्ता पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी काल (ता.३) एक दिवसीय कार्यशाळा वाचनालयाचे रामनारायण अग्रवाल सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्याध्यक्ष अनिलकुमार शाह यांनी प्रास्तविक केले. वाचनालयाच्या चिटणीस शुभदा कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बालकवयित्री मायादेवी धुप्पड व प्रतिमा जगताप यांचा वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी व कार्याध्यक्ष अनिलकुमार शाह यांच्या हस्ते तसेच प्रा. डॉ. मनीष जोशी, वाचनालयाचे उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, वाचनालयाच्या चिटणीस शुभदा कुलकर्णी, महिलासामिती प्रमुख संगीता अट्रावलकर यांनी वाचनालयातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी भारती गोडबोले, कवयित्री धुप्पड, किरण सोहळे यांनी मार्गदर्शन केले. प्राजक्ता शिरुडे यांनी सूत्रसंचालन केले. वाचनालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रभात चौधरी, प्रा. शरच्चंद्र छापेकर, प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. अपर्णा भट, महिला समिती सदस्य डॉ. वैजयंती पाध्ये, आदी मान्यवर उपस्थित होते.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.