The subject material seized by the rural police esakal
नाशिक

Nashik Crime: आधारकार्डच्या ठशांचा दुरुपयोग प्रकरणी पोलिसांची कारवाई; 3 लाख रुपये हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या हाताच्या ठशांचा वापर करत त्यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेणाऱ्या संशयितांकडून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने सुमारे दोन दुचाकीसह दोन लाख ८३ हजार रुपये हस्तगत केले आहे. (Police action in case of misuse of Aadhaar card prints 3 lakhs seized Nashik Crime)

पळाशी व वेहेळगाव (ता.नांदगाव) येथे जानेवारी २०२३ मध्ये आधारकार्ड अपग्रेडेशन कॅम्प घेण्यात आला होता. यावेळी संशयित किशोर लक्ष्मण सोनवणे (वय २१, रा. उपखेडा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), रवींद्र विजय गोपाळ, आणि सोमनाथ काकासाहेब भोंगाळ (वय २३, दोघे रा. रा. बाणगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी नागरिकांच्या बायोमॅट्रिक फिंगर स्कॅनरद्वारे नागरिकांच्या अंगठयांच्या ठशांचा डाटा संकलित करून त्या माध्यमातून नागरिकांच्या खात्यातून पैसे परस्पर वर्ग करत फसवणूक केली होती.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पळाशी येथील समाधान संजय घुगे यांनी नाशिक च्या ग्रामीण सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून चाळीसगाव तालुक्यातून सर्व संशयित यांना अटक केली होती. न्यायालयाने सर्व संशयित यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

सायबर पोलिसांनी तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत या संशयित यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून या प्रकरणात वापरलेले ४ मोबाईल फोन, ४ लॅपटॉप, ४ बायोमॅट्रिक फिंगर स्कॅनर, १ आयरिश मशिन, १ फेस कॅमेरा तसेच फसवणुकीचे पैशातून खरेदी केलेल्या दोन दुचाकी असा सुमारे २ लाख ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शासनमान्य केंद्रावरच माहिती अद्ययावत करा

शासनमान्य आधारसेवा केंद्रावर जाऊनच नागरिकांनी आधार संबंधित माहिती अद्ययावत करावी. कोणीही इसम अशाप्रकारे अनधिकृत आधार अपडेशन कॅम्प घेत असेल तर जवळच्या पोलिस ठाणेशी तत्काळ संपर्क करावा.

तसेच आधारकार्ड अद्ययावत करण्याचे नावाखाली AEPS (आधार इनेबल पेमेंट सिस्टीम) सेंटरद्वारे ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित संबंधित बँक शाखा, पोलिस ठाणे किंवा नाशिक ग्रामीण सायबर पोलिस ठाणे (०२५३-२२००४०८) येथे संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT