criminals arrested esakal
नाशिक

Nashik : डॉक्टरवर हल्ला करणारे संशयित पोलिसांच्या ताब्यात

अंबादास शिंदे

नाशिक रोड : बिटको हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय मदत (Emergency medical help) पुरविणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे (Ambulance) डॉ. ओंकार पाटील यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर (Attackers) आणि एक गावठी पिस्तूल (Pistol) बाळगणाऱ्या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस, मोबाईल, कोयता असा मुद्देमाल जप्त केला. (Police arrest suspects doctor attackers Nashik Crime News)

नाशिक रोडचे पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. शैलेश गोपीचंद सहारे (२१, रा. नाशिक रोड) हा मालधक्का परिसरात संशयितरीत्या फिरत असून, त्याच्याजवळ कट्टा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अनिल शिदे यांनी तत्काळ गुन्हे शाखा अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना संशयितास ताब्यात घेण्याची सूचना केली. पोलिसांनी साध्या वेशात जाऊन सापळा रचला व सराईत शैलेश सहारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस मिळाले.

तसेच बिटको हॉस्पिटल येथे डॉ. ओंकार पाटील यांच्यावर हल्ला करणारे संशयित प्रणव प्रदीप इंगळे (१८, रा. देवळाली गाव), शाहीद शौकत सय्यद (१८, रा. सत्कार पॉइंट, नाशिक रोड), यज्ञेश ऊर्फ मॅडी ज्ञानेश्वर शिंदे (१९, रा. चंदनवाडी, सुभाष रोड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, कलाम मन्सूरी (रा. गुलाबवाडी, मालधक्का रोड) हा फरार आहे. गुन्ह्यात वापरलेला कोयता, मोबाईल, अडीच हजार रुपये, असा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे, राजू पाचोरकर, योगेश पाटील, जयेश गांगुर्डे, अनिल शिंदे, मनोहर शिंदे, विशाल पाटील, संदीप बागल, विष्णू गोसावी, कुवन राठोड, राकेश बोडके, श्री. जाधव, श्री. कोकाटे यांनी कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT