Senior Police Inspector Vijay Dhamal of Crime Branch Unit One along with the two suspects who looted the woman's purse and his team.  esakal
नाशिक

Nashik Crime News: महिलेची पर्स लंपास करणारे दोघे गजाआड; युनिट १ च्या पथकाकडून कारवाई

सराफ बाजारातील फुल बाजारात आलेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ओढून पोबारा केल्याची घटना घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सराफ बाजारातील फुल बाजारात आलेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ओढून पोबारा केल्याची घटना घडली होती.

या गुन्ह्याचा तपास करताना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (police arrested two for stole women purse nashik news)

मोहम्मद नाशर सय्यद (१९), अफजल शब्बीर सय्यद (१८, दोघे रा. पाटाजवळ, फुलेनगर, पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जगदीश बोडके (रा. पेठरोड) हे गेल्या २३ तारखेला रात्री आठ वाजेच्या सुमारास सराफ बाजारातील फुल बाजारमध्ये खरेदीसाठी आले होते.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी बोडके यांच्या पत्नीच्या हातातील पर्स हातचलाखीने लंपास करीत पसार झाले होते. पर्समध्ये पैसे व दागिने असे १९ हजार ६०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी बोडके यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर बोडके यांनी थेट आयुक्तालयाच्या व्हॉटसॲप क्रमांकावर घडलेल्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत घटनेची माहिती दिली. त्यानुसार आयुक्तांनीही तात्काळ तपास करण्याच आदेश गुन्हेशाखेला दिले होते.

सीसीटीव्ही फुटेज

शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. परंतु त्यातील बहुतांशी कॅमेरे हे बंद होते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासले असता, त्यामध्ये संशतियांची हालचाली निदर्शास आल्या.

त्यानुसार युनिट एकचे उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार राजेश राठोड, देवीदास ठाकरे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे यांनी संशयितांचा तपास करीत फुलेनगर परिसरातून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व रोख रक्कम असा ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस चौकशीतून आणखी गुन्हेंची उकल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT