नाशिक

पोलिस पथकावर हल्ला

CD
धुळे ः टुडे १ साठी -- वाळू वाहतूकदारांचा पोलिस पथकावर हल्ला - धरण परिसरात ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न; कारची तोडफोड सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : निम्न पांझरा अक्कलपाडा (ता. साक्री) मध्यम सिंचन प्रकल्प परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावर वाळू वाहतूकदारांनी हल्ला केल्याची घटना १७ ऑक्टोबरला मध्यरात्री घडली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासह कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तसेच, पोलिसांच्या कारची तोडफोड करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष मुंढे आणि पोलिस उपनिरीक्षक राहुल गबांग हे १७ ऑक्टोबरला मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान गस्तीवर असताना अक्कलपाडा धरण परिसरात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळला. पोलिसांनी तो थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रॅक्टर पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून पळ काढला. पाठलाग करून ट्रॅक्टर थांबविल्यानंतर घटनास्थळी उपस्थित संशयितांनी कोयता आणि कुऱ्हाडीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वाळूच्या डेपोजवळ पोलिसांच्या कारचा (एमएच ०२ एफवाय २८२०) पुढील टायरही फोडण्यात आला. या घटनेत शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याची फिर्याद सहायक पोलिस निरीक्षक मुंढे यांनी दिली. याप्रकरणी अतुल नाना श्रीराम (रा. भदाणे, ता. धुळे), खुशाल हिरामण गोयकर, विजय नवल सरक, बबन माणिक मारनर, गोटू माणिक मारनर आणि नितीन मारनर (सर्व रा. महिर, ता. साक्री) यांच्यासह अन्य दोन ते तीन जणांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT