नाशिक

धुळे पोलिसांवर हल्ला

CD
धुळे ः टुडे १ साठी, मेन -- फोटो क्रमांक ः 34072 व 34073 धुळे : वडजाई रोडवरून वॉन्टेड आरोपीला नेताना आझादनगरचे पोलिस पथक. दुसऱ्या छायाचित्रात मोहाडीत तलवारीने दहशत निर्माण करणारा राजवीर भादा. -- वॉन्टेड आरोपी समर्थकांचा पोलिसांवर हल्ला - जमावाने सिनेस्‍टाईल आरोपीला पळवले; मोहाडीत तलवारीने पोलिसांना ललकारले सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३० : शहरात खाकी वर्दीचा धाक संपल्याचे चित्र असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वॉन्टेड आणि फरार आरोपींना गजाआड करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून थेट प्राणघातक हल्ले चढविण्याचे प्रकार घडत आहेत. यात एका घटनेत मोहाडी भागात कुख्यात आरोपीने पोलिसांवर तलवारीने चाल करून धिंगाणा घातला, तर दुसऱ्या घटनेत वडजाई रोड परिसरात वॉन्टेड आरोपी समर्थकांच्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत ताब्यातील फरार आरोपीला फिल्मी स्टाईलने पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली. या दोन्ही गंभीर प्रकरणांमुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहरात दहशत पसरली आहे. - मोहाडीत तलवारीचा नाच मोहाडी परिसरातील दंडेवालाबाबा नगर भागात गुरूवारी (ता. २९) पोलिसांना थेट आव्हान देणारी थरारक घटना घडली. तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी राजवीर मिलनसिंग भादा (रा. दंडेवालाबाबा नगर, मोहाडी) याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक तिथे गेले होते. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी राजवीर भादा हातात लोखंडी तलवार घेऊन थेट घराच्या छतावर चढला. तेथून तो पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, ‘तुम आगे मत बढो, मै खुद को मार दूंगा, आपको तलवार से मार दूंगा,’ अशी उघड धमकी देत होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन जवळ जात असताना, त्याने ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर धावून जात तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वतःच्या हातातील तलवार जोरजोरात फिरवून स्वतःच्या अंगावर वार करून दुखापत करून घेतली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. - भादाला घेतले ताब्यात या प्रकारामुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजीत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, तसेच मोहाडी आणि तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत आरोपी राजवीर भादा याच्या मुसक्या आवळत त्याला अखेर ताब्यात घेतले. याप्रकरणी मोहाडी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादा याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. - फिल्मी स्टाईल थरार दिवसभर मोहाडीतील तणावानंतर गुरूवारी (ता. २९) रात्रीच्या सुमारास आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची आणखी एक लाजीरवाणी घटना समोर आली. यात २००९ मधील एका जुन्या गुन्ह्यात फरार असलेला वॉन्टेड आरोपी जब्बार शाह गुलाब शाह फकीर (रा. वडजाई रोड, धुळे) याला अटक करण्यासाठी आझादनगर पोलिस ठाण्याचे पथक रात्री पावणेनऊच्या सुमारास वडजाई रोडवर (नंदी रोड भाग) गेले होते. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत जब्बार शाह याला ताब्यात घेतले असतानाच, त्याच्या समर्थकांनी पोलिसांसमोर मोठा उद्रक केला. तमन्ना गुलाब शाह, मेहराज बानू शाह, हलीमा बी गुलाब शाह, नजबा बी इस्माईल शाह, परमीर बी इस्माईल शाह, आदि बी गुलाब शाह, जाकीर गुलाब शाह, इकबाल गुलाब शाह, मुजमील रफिक शाह, फकीर शाह यांच्यासह जमावाने पोलिसांना घेरले. - १३ जणांवर गुन्हा ‘उसको तकलीफ हो रही है, उसे दवाखाना लेके चलो,’ असे नाटक करत आणि खोटे कारण पुढे करत जमावाने पोलिसांवर दबाव आणला. शासकीय वाहनात बसवू न देता गदीर्चा आणि नियोजित कट रचून फायदा घेत जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीमध्ये एक पोलिस कर्मचारी गौतम सपकाळ यांचे कपडे सुद्धा फाडण्यात आले. या घटनेत महिला पोलिस कर्मचारी जयश्री मोरे, सुरेखा साबळे जखमी झाल्या. तसेच पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनाही धक्काबुक्की झाली. तेही जखमी झाले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सपकाळ यांच्या फिर्यादीनुसार आझादनगर पोलिस ठाण्यात जमावातील संशयित १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला असून आमीन रफीक शाह, मुजमील रफिक शाह, रफिक गुलाब शाह यास अटक केली आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

Marathi News Live Updates : पुण्यात मंगळवार पेठेत पेट्रोलने भरलेला टँकर कठडा तोडून रस्त्याच्या पलीकडे; मोठी दुर्घटना टळली!

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

SCROLL FOR NEXT