Police Inspector Bhagwan Mathure, Nitin Khandangle, Police Patil, Sunil Wagh etc. went to the house of Archana More, a widow, and celebrated the marriage ceremony. esakal
नाशिक

Bhaubij 2022 : आदिवासी विधवा महिलेच्या घरी खाकी वर्दीची भाऊबीज!

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : आदिवासी समाजातील एक विधवा भगिनी रोजंदारी करून आपल्या पाच लेकीना शिकवते, त्यांना अकॅडमीत शिक्षण देते अन त्यांच्यावर संस्कार करते, हे नक्कीच कौतुकास्पद आहेत. तिची परिस्थितीशी लढण्याची जिद्द कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याने तिच्या या लढ्यात बळ देण्यासाठी येथील पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व सहकाऱ्यांनी खाकीतल्या माणुसकीचा ओलावा दाखवत तिच्या कुटुंबीयांसोबत भाऊबीज साजरी केली. आपल्या बहिणीला साडीचोळीसह पाचही लेकींना नवे कपडे देऊन माणुसकीचे अनोखे दर्शन मथुरे यांनी घडविले. (Police celebration bhaubij with tribal widow who teaches five girls at yeola nashik news)

समाजात खाकी वर्दीची तशी दहशत असते, पण माणुसकीचा ओलावा या खात्यात आजही पहावयास मिळतो. शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दीपावली सणात कुटुंबापासून दूर राहत असताना नांदेसर येथील आदिवासी विधवा महिलेच्या घरी जाऊन या बहिणीच्या हाताने ओवाळत आपली भाऊबीज साजरी केली. नांदेसर येथील अर्चनाताई मोरे यांच्या घरी जात श्री. मथुरे आणि सहाय्यक निरीक्षक अनिल खंडांगळे, पोलिस कर्मचारी देवडे, होलगडे, कदम, पोलिस पाटील सुनील वाघ यांनी भाऊबिज साजरी केली.

अर्चना मोरे या विधवा असून त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढत असताना मुलींवर चांगले संस्कार करत अशाही परिस्थितीत त्या मुलींना शिक्षण देत आहेत. त्यांची परिस्थितीशी लढण्याची जिद्द नक्कीच कौतुकास्पद आणि इतरांना प्रेरणा देणारी आहे. अर्चना मोरे यांना पोलीस निरीक्षक भगवान मथुरे भाऊबीजेची साडी आणि त्यांच्या पाचही मुलींना नवीन ड्रेस व दिवाळीचा फराळ दिला. त्यांच्या कुटूंबाची कुतूहलाने चौकशी केली. ताईच्या धैर्याचे कौतुकही मथुरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT