Traffic police taking action against reckless drivers esakal
नाशिक

Nashik News: बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका! वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Traffic Police Fined : शहरात ठिकठिकाणी बेशिस्त वाहनचालक दिसून येतात. ट्रिपलसीट आणि विनाहेल्मेट सर्रासपणे दुचाकी चालवितात. चौकांमध्ये रिक्षा बेशिस्तपणे थांबल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडते.

मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. (Police crack down on unruly drivers Penalty action by traffic police through e challan Nashik News)

सध्या अधिक मास असल्याने शहरात धार्मिक विधीनिमित्ताने येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. राज्यभरातून भाविक येतात, तसेच जिल्हाभरातूनही येतात. यामुळे शहरात वाहनांची वर्दळ वाढली आहे.

त्याचप्रमाणे, महाविद्यालयेही सुरू असल्याने विद्यार्थीही दुचाकी, मोपेड वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

तर गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये बेशिस्तीमुळे दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

शहरातील सिग्नल्स, मुख्य चौकांसह वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

या कारवाईत पोलिसांनी ट्रिपलसीट वाहनांसह विनाहेल्मेट, नंबर प्लेट खराब, वाहनांची कागदपत्रे नसणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे अशा वाहनचालकांना लक्ष केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही मोहीम सुरू असताना दुचाकीचालक विनाहेल्मेट, राँग साइड, दुचाकीची नंबरप्लेट तुटलेली आणि ट्रिपलसीट असल्याने चालकाने एक नव्हे तर चार वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे पोलिसांनी दोन हजार रुपये दंड ई-चलनाद्वारे आकारले. वाहतूक शाखेतर्फे धडक कारवाई केली जात आहे.

स्मार्ट रोडकडे पाठ

स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी नित्याची आहे. आठवडाभरापूर्वी सहाय्यक पोलिस आयुक्तांनी स्मार्ट रोडवर अनधिकृतरीत्या पार्क करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांवर ई-चलनाद्वारे कारवाई केली.

परंतु त्यानंतर वाहतूक शाखेला पुन्हा कारवाई करण्याचा विसरच पडला आहे. त्यामुळे शहरातील कोंडी होणाऱ्या मार्गांवर नित्याने ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केल्यास कोंडी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT