police esakal
नाशिक

PM Modi Nashik Visit : पोलिसांनी 69 आंदोलकांना केले नजरकैद

दौऱ्यादरम्यान कोठेही निषेध व आंदोलनाचे गालबोट लागू नये यासाठी ४६ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजाविण्यात आलेल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून शहर-जिल्ह्यातील ६९ आंदोलकांना ताब्यात घेत नजरकैद केले तर, दौऱ्यादरम्यान कोठेही निषेध व आंदोलनाचे गालबोट लागू नये यासाठी ४६ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजाविण्यात आलेल्या होत्या. (Police detained 69 protesters during pm modi visit in nashik news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. १२) नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आंदोलकांकडून निषेध वा आंदोलनाची शक्यता होती. त्यामुळे असा कोणताही प्रकार पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून कलम १४९ अन्वये शहर जिल्ह्यातील ४६ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या.

कांदानिर्यातबंदी विरोधात जिल्ह्यातील आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात आंदोलने केली आहेत. अशा आंदोलकांना शहर व ग्रामीण पोलिसांनी समज देत नोटिसा बजावल्या.

यामध्ये शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील २१ तर, नाशिक ग्रामीणमधील ३३ जणांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. त्याचप्रमाणे, काही आंदोलकांकडून दौऱ्यादरम्यान निषेध वा आंदोलन करण्याची शक्यता असल्याने शहर-जिल्ह्यातील ६९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत नजरकैद केले होते.

यामध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील ३६ तर, नाशिक ग्रामीण हद्दीतील ३३ आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावत ताब्यात घेतले होते. या आंदोलकांना पोलिसांनी दुपारी चार वाजेनंतर मुक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar: निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् नवजात बाळ तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं,...घटनेनं संताप

Hockey Jersey Controversy: हॉकी संघाच्या भगव्या जर्सीवरून वाद पेटला, अध्यक्षांना अंधारात ठेवून निर्णय घेतला... Email ने उडवली खळबळ; नेमका वाद काय?

'आम्ही एकत्र जेवतो, गप्पा मारतो...' 'सनई चौघडे'मुळे पुन्हा भेटल्या कॉलेजच्या मैत्रिणी; मेघना एरंडेचा खास खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित

Valti Bridge Danger: ४० वर्षांपूर्वीचा वळती-मांगीरबाबा पुल वाहतुकीसाठी धोकादायक

SCROLL FOR NEXT