नाशिक

पोलिसांची कर्तव्याची दिवाळी

CD
लोगो : कर्तव्याची दिवाळी.... ----------------- NSK26H34777 जळगाव : शहर पोलिस ठाण्यात दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असलेले कर्मचारी. --------- शहराच्या सुरक्षेसाठी पोलिस रस्त्यावर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : प्रत्येकजण आपल्या परीने दिवाळी साजरी करण्यात मग्न असतो. मात्र, शहरातील प्रत्येक नागरिकाची दिवाळी सुरक्षित व आनंदात जावी, यासाठी काही जणांना स्वतःच्या सणाच्या आनंदावर विरजण घालावे लागते. हेच खरे चित्र आहेत पोलिसांच्या दिवाळीचे. शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी होणारी गर्दी, वाहतुकीची कोंडी, फटाक्यांमुळे उद्भवणाऱ्या घटना, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न व नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना पोलिसांना सणाच्या दिवसांतही विश्रांती मिळत नाही. सर्वसामान्य नागरिक आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद घेत असताना पोलिस मात्र, गणवेशात रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावतात. घरापासून दूर, कर्तव्याच्या जवळ! दिवाळीच्या दिवसांत बंदोबस्ताला विशेष महत्त्व असते. बाजारपेठा, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे व सार्वजनिक परिसरात पोलिसांची गस्त वाढविली जाते. नागरिकांना खरेदी करताना त्रास होऊ नये, महिलांची सुरक्षितता अबाधित राहावी, वाहतूक सुरळीत राहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस तासन्‌तास उभे राहून सेवा देतात. या काळात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांसोबत फटाके फोडता येत नाहीत, कुटुंबीयांसोबत फराळ करता येत नाही किंवा दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. घरात दिवाळीची तयारी सुरू असते; मात्र कुटुंबातील सदस्यांच्या मनात आपल्या माणसाची ड्युटी कधी संपणार, याची प्रतीक्षा असते. ......... ....... कोट दिवाळी हा प्रत्येकासाठी आनंदाचा व कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सण आहे. आम्हालाही आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावीशी वाटते. मुलांसोबत वेळ घालवावा, घरातील सणाच्या तयारीत सहभागी व्हावे, असे प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला वाटते. मात्र, गणवेश परिधान केल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांत महत्त्वाची ठरते. सणाच्या काळात महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक सुरक्षितपणे बाहेर पडावेत, त्यांची खरेदी विनाअडथळा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद व सुरक्षिततेचे समाधान हेच आमच्यासाठी दिवाळीचे खरे गिफ्ट आहे. -दीपिका महाजन, पोलिस कर्मचारी, जळगाव. ....... कोट दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. वाहतूक नियंत्रण, नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागते. अनेकदा सणाच्या दिवशीही कुटुंबापासून दूर राहून ड्युटी करावी लागते. घरातील लहान मुलांना आपली आठवण येते, कुटुंबीयांनाही आपण सोबत असावे असे वाटते. मात्र, आपण ड्युटीवर असल्यामुळे हजारो कुटुंबे सुरक्षितपणे दिवाळी साजरी करू शकतात, याचे समाधान असते. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, वाहतुकीचे नियम पाळावेत व सुरक्षित दिवाळी साजरी करावी. -शिवाजी धुमाळ, पोलिस कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Diwali Celebration: सिंहगडावर दिवाळी पहाटेचा अनोखा दीपोत्सव! कल्याण दरवाजात मशालींची रोषणाई, तानाजी मालुसरेंच्या समाधीवर दीपज्योती

Rajasthan Voter List Discrepancy : 30 लाख मतदारांची नावे गहाळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात, SIR प्रक्रियेनंतर दोन याद्यांमध्ये तफावत

U19 IND vs U19 PAK: एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले अन् तिघांकडून भारतीय फलंदाजाचा कॅच सुटला! पाहा Comedy Fielding ड्रामा

Latest Marathi News Live Update: : "आमदारांचे वेतन बंद करा, पण दिव्यांगांचे मानधन ५ ते १० हजारांपर्यंत वाढवा"; अमरावतीच्या कार्यक्रमात आमदार रवी राणांची आक्रमक मागणी

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

SCROLL FOR NEXT