Police officers of the Crime Branch while detaining the natives and suspects from Sriram Nagar area here esakal
नाशिक

Nashik Crime News : आडगांव हद्दीत देशीदारूचा कट्टा; पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात

आडगांव येथील श्रीराम नगर मध्ये संशयीताकडे एक देशी दारूचा कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.

उत्तम गोसावी : सकाळ वृत्तसेवा

ओझर : नाशिक गुन्हे शाखा दोनचे कर्तव्यदक्ष पोलिस अंमलदार महेश कानबहाले पोलिस अंमलदार तेजस मते यांना काल आडगांव येथील श्रीराम नगर मध्ये संशयीताकडे एक देशी दारूचा कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. (police have laid trap and taken possession of group of country liquor in Adgaon limits nashik crime news)

या माहितीच्या आधारावर व वरिष्ठांच्या मार्गदर्शना वरून पोलिस निरिक्षक संदेश पाडवी, पोलिस हवालदार राजेंद्र घुमरे, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनिल आहेर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, विशाल पाटील, तेजस मते, महेश कानबहाले, किसन कुवर, समाधान वाजे आदिंनी आडगांव हद्दीतील मदर तेरेसा रोड इनिव्हल एटरप्रायजेस समोर श्रीरामनगर येथे सापळा लावला असता तो यशस्वी झाला.

त्यात छापा टाकून ओझर येथील संशयीत योगेश चंद्रकांत दांडे वय ३० राहणार योगी दर्शनी अपार्टमेंट सिताईनगर ओझर याच्याकडून देशी बनावटीचा एक कट्टा तसेच एक राऊंड जिवंत काडतूस ताब्यात घेण्यात आले संशयीतास मुद्देमालासह आडगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT