

MS Dhoni and CSK Captain Ruturaj Gaikwad Arrive in Chennai:
Sakal
MS Dhoni and CSK Captain Ruturaj Gaikwad Arrive in Chennai: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला (IPL 2026) मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या स्पर्धेसाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. काही महिन्यांपूर्वीच आयपीएल २०२६ साठी लिलाव झाला होता, या लिलावात बऱ्याच संघांनी मोठे बदल केले.
चेन्नई सुपर किंग्सनेही (CSK) युवा खेळाडूंना संघात घेण्यावर भर दिला. त्यामुळे यंदा चेन्नईच्या संघात अनेक नवे चेहेरे दिसणार आहेत. दरम्यान, आता स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बरेच संघ तयारीला लागले असून चेन्नईनेही सुरुवात केली आहे. शनिवारी (२८ फेब्रुवारी) चेन्नई संघातील अनेक खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत.