चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या दुचाकी esakal
नाशिक

दुचाकी व मोबाईल चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

रतन चौधरी

सुरगाणा (जि. नाशिक) : घरातून मोबाईलची चोरी झाल्याचे लक्षात येताच विष्णू पवार यांनी पोलिस ठाण्यात मोबाईल चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून पोलिस हवालदार प्रवीण सानप, नाईक विश्वनाथ काकड यांनी संशयित कमलाकर पवार (२१, शांतीनगर), सुनील गांगुर्डे (२० दवाखानापाडा), अजय सोलंकी (२७ गांधीनगर) हे सुरगाणा शहरातील तर चेतन चव्हाण (२०, मालगव्हाण) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी आपल्या खाक्या दाखविताच त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी १७ मोबाईल व ७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या चौघांना दिंडोरी न्यायालयात उभे केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला, परंतु सुनील गांगुर्डे यास वेळेत जामीनदार न मिळाल्याने त्याची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे.

कमलाकर पवार याच्यावर यापूर्वीही अनेक चोरीच्या (Thief) घटनांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. या चौघांनी वणी, सुरगाणा, बोरगाव, कळवण येथून दुचाकी चोरल्याचा संशय आहे. यामध्ये तीन दुचाकीवर नंबर नसून ४ दुचाकीवर बनावट नंबर आढळून आले आहेत. याबाबत पोलिस तुळशीराम चौधरी, एम. के. पवार हे तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT