पोलिसांकडून कारवाई  esakal
नाशिक

रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या व्यवसायांवर पोलिसांकडून बडगा

नरेश हाळणोर

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये स्ट्रीट क्राईम वाढल्याने खडबडून जाग आलेल्या शहर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषतः सिडको, सातपूर, पंचवटी आणि नाशिक रोड भागात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून खून, प्राणघातक हल्ले, हाणामाऱ्या, लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे शहर पोलिसांच्या कारभारावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते.

तसेच, सिडको, सातपूर, पंचवटी आणि नाशिक रोड या परिसरात रात्री उशिरापर्यंत चायनीज गाडे, हॉटेल्स सुरू असतात. पोलिसांनी रात्री दहा वाजेनंतर परवानगी असलेले हॉटेल्स वगळता चायनीज गाड्यांसह हॉटेल्स, दुकानांना बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.

असे असतानाही नियम डावलून व्यवसाय सुरू असल्याची बाब पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने, पोलिस ठाणेनिहाय निर्धारित वेळेनंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अशा व्यावसायिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

उपनगरी परिसरामध्ये असलेल्या चायनीज गाड्यांवर टवाळखोरांकडून मद्यपान केले जात असल्याचे सर्रासपणे दिसून येते. टवाळखोर बाहेरून मद्याच्या बाटल्या आणून चायनीज गाड्याजवळ पीत बसतात. यातून अनेकदा वादावादी व हाणामारीचेही प्रकार घडलेले आहेत, तर गेल्यावर्षी सिडकोत खूनही झाला होता. मात्र, तरीही पोलिसांकडून अशा व्यावसायिकांकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र, आता पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठी अपडेट समोर! दि. बा. पाटलांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब, उद्घाटन कधी?

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

SCROLL FOR NEXT