नाशिक

सप्तशृंगगडाच्या कड्यावर मृत्यूला कवटाळण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या समयसूचकतेने युवकाला जीवदान!

CD
३६-२ पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाचे प्राण वाचले ----------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१५ : प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्याने जीवन संपविण्याच्या विचाराने सप्तशृंगगडाच्या डोंगरावरील कड्यावर पोहोचलेल्या एका युवकाला पोलिस आणि कुटुंबीयांच्या प्रसंगावधानामुळे नवे आयुष्य मिळाले. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या या युवकाला पोलिसांनी संयमाने संवाद साधत आणि विश्वासात घेत सुखरूप खाली आणले. शुक्रवारी (ता.१३) दुपारी ही घटना घडली. ----------- अहिवंतवाडी (ता. दिंडोरी) येथील हा युवक शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास सप्तशृंगगडावर आला होता. प्रेमप्रकरणातून तो नैराश्यात असल्याने टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होता. त्याने थेट वडिलांना फोन करून आपण देवीच्या कड्यावरून उडी मारून जीवन संपविणार असल्याचे सांगितले. वडिलांनी त्वरित सप्तशृंगगड पोलिस दूरक्षेत्राशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. हवालदार मन्साराम बागूल आणि कॉन्स्टेबल चौधरी यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. कड्यावर असलेल्या युवकाला खाली येण्यासाठी घाई किंवा दबाव न आणता पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. पोलिस आणि कुटुंबीयांनी त्याला विश्वासात घेत धीर दिला. रोपवे गेटजवळील केबिनमध्ये बोलावून घेण्यात यश मिळविले. तासभर चाललेल्या या संवादातून युवकाला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याला सुखरूप नातेवाइकांच्या ताब्यात दिले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

ट्रेनिंगदरम्यान जुळले प्रेमाचे धागे, IAS-IPS अधिकारी अडकले विवाहबंधनात; विवेक आर्य आणि अदिती सिंग यांची लव्हस्टोरी चर्चेत

Latest Marathi News Update : राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी सरकारचा व्यापक कृती आराखडा; खाणींतील पाणी शेतीसाठी वापरणार, १५ लाख शेतकऱ्यांना 'फार्मर आयडी'चा लाभ - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

FSSAI ने आणला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी खास लोगो; ग्राहकांना काय होणार फायदा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT