Police Investigation
Police Investigation esakal
नाशिक

नाशिक : बिरारी आत्महत्येप्रकरणी पुन्हा जाबजबाब

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : फेब्रुवारी २०२० मध्ये शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत सराफाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हा सराफ त्या वेळी तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात असताना ही घटना घडली होती. या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तेलंगणाच्या शमशाबाद पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी जाबजबाब नोंदविण्यात आले आहेत, तसेच संशयित पोलिस परराज्यातील असल्याने प्रकरण संवेदनशील असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सावधगिरीने तपास केला जात आहे.

तेलंगणा पोलिस चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाकामी नाशिकमध्ये आले असता, ते पेठ रोडवरील सराफ विजय बिरारी व त्यांच्या कामगारास ताब्यात घेऊन गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. २४ तास उलटूनही तेलंगणा पोलिसांनी नजीकच्या पोलिस ठाण्यास वा न्यायालयात दोघांना हजर न करता, बिरारी यांच्यावर चोरीचे सोने देण्यासाठी दबाव टाकत होते. सोने न दिल्यास हैदराबाद येथे नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. या तणावातून बिरारी यांनी २४ फेब्रुवारी २०२० ला विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत नोंद करण्यात आली होती, तर तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला होता. याच प्रकरणी सीआयडीने दोन दिवसांपूर्वी तेलंगणातील सायबराबाद पोलिस आयुक्तालयातील शमशाबाद पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रूपानी रामुलु व्यंकटेश, उपनिरीक्षक सादाम व्यंकटेशवरलू कृष्णा व एम. डी. जी. हुसेन खान खाजाखान यांच्याविरोधात बिरारी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सावधगिरीने तपास

या प्रकरणी सीआयडीचे उपअधीक्षक आर. टी. दरवडे तपास करीत आहेत. या प्रकरणी त्यांनी पुन्हा जाबजबाब नोंदविले आहेत. तसेच, यापूर्वी करण्यात आलेल्या तपासानुसार नोंदीचा बारकाईने पुन्हा तपास केला जात आहे. त्याचप्रमाणे, या प्रकरणातील संशयित परराज्यातील पोलिस असल्याने प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे याबाबत अधिक सावधगिरीने सीआयडीकडून तपास केला जात असून, संशयितांना ताब्यात घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT