Aniket Bharti, Digambar Bhadane, Vinod Shelar and Gram Panchayat officials after traveling the orphan students of the shelter organization in the yatra.
Aniket Bharti, Digambar Bhadane, Vinod Shelar and Gram Panchayat officials after traveling the orphan students of the shelter organization in the yatra. esakal
नाशिक

Nashik News : अनाथालयातील लेकरांना पोलिसांनी घडवली यात्रा; अप्पर पोलिस अधीक्षक भारती यांचा पुढाकार

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर (जि. नाशिक) : यात्रा म्हटली तर बच्चे कंपनीला खूप आनंद होतो. प्रत्येक घरातील मग शहरी असो ग्रामीण यात्रेनिमित्त फिरायला सर्वांना आवडते.

ज्यांचे कोणीही नाही अशा अनाथ मुलांना जेव्हा यात्रेची सैर घडवली जाते. तेव्हा या निराधार लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचे काम येथील पोलिसांनी केले. (Police organized yatra for children of orphanage Initiative of Upper Police Superintendent Bharti Nashik News)

अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी निळगव्हाण येथील 'आश्रय' संस्कार व पुनर्वसन संस्थेतील विद्यार्थ्यांना चंदनपुरी यात्रा घडवली. खंडेराव महाराज यांचे दर्शन घेऊन यावेळी या सर्व मुलांना यात्रेतील विविध प्रकारचे पाळणे, वेगवेगळे खेळ, शो दाखवत यात्रा सफर करत खाऊ व मिठाई खाऊ घातली.

यात्रेतील अनेक व्यावसायिक यांनी स्वतः कौतुक करत काही खेळणी मुलांना भेट दिली. मधल्या काळात दोन वर्षे कोराना कालावधीत ही अनाथ निराधार मुले कुठेही गेलेली नसल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले. आश्रय संस्थेपासून यात्रा प्रवास पोलिस वाहनातून झाल्याने ही बच्चे कंपनी खूप खूश झाली.

या मुलांच्या समवेत यात्रेत अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, चंदनपुरी येथील सरपंच विनोद शेलार, किशोर नेरकर, नीलेश निकाळे, दिलीप सोनवणे, निलेश पवार यांचेसह यावेळी आश्रयच्या अधिक्षक सुदर्शना पाटील, सुदर्शन चव्हाण, शोभा जगताप दीपाली अहिरे, सहभागी झाले होते.पोलिसांच्या या उपक्रमाचे यात्रोत्सव कमिटीसह ग्रामस्थांनी कौतुक केले.

"पोलिस अधिकारी यांच्या नियोजनानुसार यात्रा आनंददायी झाली. हा वेगळाच अनुभव होता. आमचं या जगात खूप काही असल्याचे समाधान मिळाले." - ओम पवार, विद्यार्थी

"आम्ही शाळा व आमच्या आश्रय परिवारासह कुठे गेलो नाही. अनिकेत भारती यांनी आम्हाला यात्रेची सहल घडवली.खूप आनंद झाला." - हेमंत सोनवणे, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT