Ongoing lot of police patil reservation in panchayat samiti hall. 
नाशिक

Nashik Police Bharti : दिंडोरी, पेठमध्ये पोलिस पाटील आरक्षण जाहीर; 116 रिक्त पदांवर भरती प्रकिया

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Bharti : पेठ आणि दिंडोरी तालुक्यात पोलिस पाटील संवर्गातील एकूण २९३ मंजूर पदांपैकी ११७ पदे कार्यरत असून एकूण ११६ रिक्त पदे भरण्याचे निश्‍चित केल्याने दिंडोरी पंचायत समिती हॉल मध्ये उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे आणि तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत दिंडोरी व पेठ तालुक्यातील १६६ गावांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती पुरुष ३५ तर महिला १२ असे एकूण ४७ जागा आहेत. सर्वसाधारणसाठी ९ गावे आहेत असे एकूण ५६ जागा आहेत. (Police Patil reservation announced in Dindori Peth nashik news)

पेठ तालुक्यातील ४० गावे पुरुष तर २० गावे महिला अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. यावेळी दिंडोरी व पेठ या दोन तालुक्यातील पोलिस पाटलांचे महिला आरक्षण शाळेचा विद्यार्थ्याच्या हस्ते सर्वांसमोर ईश्वर चिठ्ठी काढून काढण्यात आले.

दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती (पुरुष) : निळवंडी, जानोरी , पिंपळगाव केतकी, आंबेदिंडोरी , गणेशगाव, कुर्णोली, धामणवाडी , संगमनेर , बोलदरी , पांडाणे , फोफळवाडी , जुने धागूर , देहरेवाडी, वाघाड, तिल्लोळी , विळवंडी, पिंगळवाडी, वाघदेवपाडा, माळेगाव काजी, करंजाळी , टिटवे , वांजुळे , लोखंडेवाडी , साद्राळे , जालखेड , तळ्याचापाडा, मोखनल, देवपूर, भनवड, बोरवण, वनारे, ठेपणवाडी, नळवाडपाडा, नळवाडी, सावरपाडा असे आरक्षण निघाले आहे.

अनुसूचित जमाती महिला : खतवड , गवळवाडी, कोऱ्‍हाटे ,माळेदुमाला , उमराळे खुर्द , नवे धागूर , खेडले , निगडोळ , महाजे , वारे, चंडीकापूर , पिंप्री अंचला आरक्षण निघाले आहे.

सर्वसाधारण गावे दिंडोरी : लखमापूर (अनुसूचित जमाती महिला), ओझरखेड (अनुसूचित जमाती (पुरुष), परमोरी (विभक्त जमाती पुरुष), लोखंडेवाडी (इतर मागास प्रवर्ग पुरुष), आक्राळे (आर्थिक दुर्बल पुरुष), वनारवाडी ( सर्वसाधारण महिला), मातेरेवाडी (सर्वसाधारण पुरुष), जोपूळ (सर्वसाधारण पुरुष), सोनजांब (सर्वसाधारण पुरुष) आरक्षण निघाले आहे.

पेठ तालुक्यातील अनुसूचित जमाती (पुरुष) : कोटंबी, हनुमंतपाडा, कायरे (साद्रडपाडा), काळुणे, खडकी शिगाळी , तोंडवळ, आंबापान, बेडमाळ, आंबापूर, खंबाळ, बेलपाडा, बोरपाडा , कहांडोळपाडा, जळे, कोपुर्ली बु., सुरगाणे , डोमखडक, बोरथा, जोगमोडी, पिंपळपाडा, फणसपाडा बु, आमडोंगरा, वीरमाळ, पळसी खुर्द, बर्डापाडा, चिकाडी -नाचलोंढी, देवीचामाळ, वाजवड-नाचलोंढी, डोरमाळ, गांगोडबारी, माणकापूर, मुरुमटी, घोटविहीर, ससुणे, कुळवंडी , उंबरपाडा क, मानकापूर, डोंगरशेत, आमलोन, नाचलोंढी , अभेटी आरक्षण सोडत निघाली आहे.

पेठ तालुक्यातील अनुसूचित जमाती महिला : उंबरपाडा, सावर्णा, गारमाळ , जांबविहीर, बिलकस, आसरबारी, तोरणमाळ, गांडोळे, भातविहीर, मोहपाडा, कोपुर्ली खु., फणसपाडा पा., कोहोर, उंबरपाडा क, पिंपळवटी, चोळमुख, वाघेचीबारी, धुळघाट, घनशेत, रायतळे आरक्षण सोडत निघाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तळोजा जेल परिसरात बिबट्याचा वावर? व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर; वन विभागानं नेमकं काय सांगितलं?

Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ५ दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार, 'या' भागांना फटका बसणार

MLA Fund : आमदारांच्‍या नशिबी फंडाची प्रतीक्षाच; वर्षभरात केवळ ६.९३ कोटींचा निधी

Crime Viral Video : प्रियसीसोबत बोलताना सापडला अन् प्रियकराला चोपचोपला, कोल्हापुरातील घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

India T20 World Cup 2026 Squad: हार्दिक पांड्याकडे पुन्हा उप कर्णधारपद? शुभमन गिलच्या निवडीवरून माजी खेळाडूचं मोठं विधान, बरोबर १ तासानंतर 'गेम' होणार?

SCROLL FOR NEXT