Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : कसाई वाड्यात पोलिसांचा छापा; 10 गोवंश जप्त

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील कमालपूरा भागातील कसाबबाडा मशीदच्या पाठीमागील कसाई वाड्यात सहाय्यक पोलिस उपअधिक्षक यांच्या विशेष पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून कत्तलीसाठीचे ९७ हजार रुपये किमतीचे १० गोवंश जप्त केली. या प्रकरणी दोघा संशयितांची चौकशी सुरु आहे. (Police raid in Kasai Wada 10 cattle seized Nashik Crime News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलिस नाईक इम्रान सैय्यद, दिनेश शेरावते, प्रशांत बागुल व शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रिती सावजी, हवालदार सुनील दांडगे, पोलिस नाईक तुषार आहिरे, योगेश ठाकुर, पंकज डोंगरे आदींनी ही कारवाई केली.

या संयुक्त पथकाने अंजुम खानच्या स्लॉटरजवळ अनिस मोहमंद खलील (रा. कमालपुरा) याच्या गोडाऊनमध्ये छापा टाकून ६ गोवंश तर अंजुम खान (रा. कसाईवाडा) याच्या गोदामात छापा टाकून ४ गोवंश जप्त केले.

गोवंश हत्याबंदी असताना गोवंश कत्तल करण्याच्या ईराद्याने घट्ट दोरीने जखडून बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आले. दोघा संशयितांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT