Candidates exiting the examination center after the written paper at KTHM College on Sunday. esakal
नाशिक

Police Recruitment : लेखी परीक्षेला 847 उमेदवारांची दांडी; 1032 भावी पोलिसांनी दिली परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त १६४ जागांसाठी रविवारी (ता. २) गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयात झालेल्या लेखी परीक्षेला एक हजार ३२ जणांनी हजेरी लावली. ८४७ जणांनी दांडी मारली.

हजर परीक्षार्थींची बायोमेट्रिक चाचणी व ओळखपरेड झाल्यानंतर त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात असल्याने नियोजित वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न होऊ शकल्याने दीड तासाच्या (९० मिनिटे) लेखी परीक्षेसाठी परीक्षार्थींना काहीसा विलंब झाल्याचे समजते. (Police Recruitment 847 candidates for written exam 1032 Prospective Police Officers appeared for exam nashik news)

महाराष्ट्र पोलिस दलात गेल्या जानेवारीपासून पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १५ पोलिस चालक आणि १६४ पोलिस शिपाई पदासाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना केटीएचएम महाविद्यालयात परीक्षेच्या एक तास आधी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

परीक्षा सकाळी दहाला होती. निर्धारित वेळेत जिल्हा, परजिल्ह्यातून परीक्षार्थी हजर झाले होते. लेखी परीक्षेसाठी दीड तासाचा (९० मिनिटे) निर्धारित वेळ होता. बायोमेट्रिक व ओळखपरेडची प्रक्रिया करण्यातच पोलिस प्रशासनाचा बराच वेळ खर्ची पडला.

परिणामी निर्धारित वेळेत लेखी परीक्षेला प्रारंभ होऊ शकला नाही. सुमारे दीड हजार उमेदवारांची बायोमेट्रिक चाचणी करण्यातच बराच वेळ गेल्याने लेखी परीक्षा काहीशी विलंबाने सुरू झाली.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

लेखी परीक्षेच्या निकालाकडे लक्ष

मैदानी चाचणीच्या निकालात २९ उमेदवारांना ५० पैकी ५० गुण असून, ते सर्व माजी सैनिक आहेत. सर्वसाधारण आणि माजी सैनिक या वर्गवारीतल्या उमेदवारांचा कटऑफ ४३ गुणांचा आहे.

गृहरक्षक दल वर्गवारीचा ४२, महिला ४०, प्रकल्पग्रस्त ३६, अनाथ ३०, खेळाडू २९, भूकंपग्रस्त २६ आणि पोलिस पाल्य २५ या गुणांचा कटऑफ आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचा कटऑफ अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षार्थींचे लक्ष आता अंतिम निकालाकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT