CSG26B03072
चाळीसगाव : पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद् घाटन करताना आमदार मंगेश चव्हाण, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, अशोक नखाते.
--------------
चाळीसगावात भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर
---------
उत्स्फूर्त प्रतिसाद; मैदानी-लेखी परीक्षेबाबत उमेदवारांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. १ : पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांना भरतीप्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे शनिवारी (ता.३१) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला चाळीसगावसह परिसरातील पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला आमदार मंगेश चव्हाण व नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा व भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक क्षमता, मैदानी परीक्षेची तयारी, लेखी परीक्षेचा अभ्यास व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता याबाबत उमेदवारांना माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकूरवाड, सह्याद्री बिले, पोलिस निरीक्षक अमित मनेळ, सहायक पोलिस निरीक्षक भरत चौधरी, विजय माळी, श्री. दाते, उपनिरीक्षक कुणाल चव्हाण यांच्यासह चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण व मेहुणबारे पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.