नाशिक

भुसावळात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

CD
NSK26H33977 भुसावळ : रेल्वेच्या मैदानावर गुरुवारी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात उमेदवारांची उंची मोजणीचे प्रात्यक्षिक घेताना प्रशिक्षक. ----------------- पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ----- भुसावळला ६००हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. ३० : येथील रेल्वे मैदानावर जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरास भुसावळ उपविभागासह परिसरातील ६००हून अधिक इच्छुक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे व पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित व भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर झाले. यात अधिकृत पोलिस भरती नियमांनुसार उमेदवारांची उंची व छाती (न फुगवता व फुगवून) कशी मोजली जाते, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवून उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. मैदानी चाचणीत पूर्ण गुण मिळविण्यासाठी गोळा कसा धरावा, फेकताना शरीराचा समतोल कसा ठेवावा व फाऊल कसा टाळावा, याचे अचूक तंत्रशुद्ध प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कागदपत्रांची पडताळणी भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक असणारे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलीयर, शैक्षणिक कागदपत्रे आदींची वेळेत पूर्तता करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या. लेखी, मैदानी परीक्षा तयारी लेखी परीक्षेतील सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता, गणित व मराठी व्याकरण या विषयांची तयारी, वेळेचे व्यवस्थापन, मैदानी चाचणीसाठी शारीरिक तंदुरुस्ती राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रक्रियेची अचूक माहिती ‘आजची तयारी...उद्याचा पोलिस अधिकारी’ या उद्देशाने ग्रामीण व शहरी भागातील भावी उमेदवारांना भरतीप्रक्रियेची अचूक माहिती मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी या शिबिराचे आयोजन होते. या शिबिरासाठी भुसावळ उपविभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: ''उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा सत्ता द्या, UCC लागू करु'' केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

ग्लेन फिलिप्सचं वादळ पुन्हा घोंगावलं, भारताविरुद्ध शतकासह न्यूझीलंडला पार करून दिला २५० धावांचा टप्पा

Samruddhi Expressway: हेक्टरी एक लाखांची मदत द्या, अन्यथा रेल रोको! समृद्धी महामार्ग रोखून शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार नितीन देशमुख यांचा सरकारला इशारा

Marathi News Live Updates : उत्तराखंडमधील जोशीमठ येथे बद्रीनाथवरुन परतणारे हेलिकॉप्टर बेपत्ता

WHO IS DHIRAJ JADHAV? सचिन तेंडुलकरचा रिप्लेसमेंट म्हणून संघात आला, पण गौतम गंभीरमुळे विस्मृतीत हरवून गेला; कोण आहे मालेगावचा स्फोटक फलंदाज?

SCROLL FOR NEXT