पाळधीत पोलिस भरतीपूर्व
प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
३०० हून अधिक तरुण-तरुणींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३० : पोलिस दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलातर्फे पाळधी येथे आयोजित पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात पाळधीसह धरणगाव परिसरातील ३०० हून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गावाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या ११ सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनावरण करण्यात आले.
सुगोकी लॉन्स येथे आयोजित या शिबिराला पालकमंत्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चौकट
पाळधीला सौरऊर्जेवरील कॅमेऱ्यांचे बळ
पाळधी गावातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत निधीतून ११ सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाच्या विनंतीनुसार उभारण्यात आलेल्या या यंत्रणेचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील हालचालींवर लक्ष ठेवणे, संशयास्पद घटनांची नोंद घेणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.