Police Recruitment
Police Recruitment esakal
नाशिक

Police Recruitment : येत्या रविवारी पोलीस शिपाई पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा

नरेश हाळणोर

नाशिक : राज्यभरात राबविण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची येत्या रविवारी (ता. २) लेखी परीक्षा होते आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील शिपाई पदासाठीही येत्या रविवारी (ता. २) केटीएचएम महाविद्यालयात लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

यासशठी पात्र उमेदवारांना ई-मेल आणि मेसेजद्वारे परीक्षेची माहिती दिली जाणार आहे. (Police Recruitment Written examination of police constable eligible candidates on coming Sunday nashik news)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

राज्यभरात गेल्या जानेवारीमध्ये पोलीस शिपाई आणि चालक पदासाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त १६४ जागांसाठी जानेवारी २०२३ पासून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

त्यानुसार चालक पदाच्या १५ जागांसाठी नुकतीच लेखी परिक्षा झाली असून त्यांचा निकालही जाहिर झाला आहे. तर शिपाईच्या १६४ रिक्त पदाच्या लेखी परिक्षेचे नियोजन येत्या रविवारी केले असून पात्र उमेदवारांना तसे कळविण्यात आले आहे.

पात्र उमेदवारांनी हॉल तिकीट, ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन रविवारी सकाळी ६.३० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहवे असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांना काही तक्रार असल्यास त्यांनी ०२५३-२२००४०१, २२००४९५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT