Police saved life of mom & son esakal
नाशिक

अनंत चतुर्दशीला पोलिस आले विघ्नहर्ता बनून; वाचविले महिला व मुलाचे प्राण

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : खऱ्या आयुष्यात विघ्नहर्ता म्हणून धावून जाणाऱ्या पोलिसांतील माणसांना आज विघ्नहर्त्यांस्वरूपात गोदाकाठ वासीयांनी अनुभवलं. घटनाही घडली तशीच.

ब्राम्हणवडे ता निफाड येथील कौटुंबिक समस्येला कंटाळत आत्महत्या करायला निघालेल्या महिलेला सायखेडा पोलिसांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळत अनंत चतुर्दशी ला सायखेडा पोलिसांच्या रुपात विघ्नहर्ता आल्याचे दिसून आले. सदर घटना शुक्रवार दि ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. (police Saved lives of women children Anant Chaturdashi 2022 Nashik Latest Marathi News)

अनंत चतुर्दशीनिमित्त सकाळी सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी हे गोदावरी नदी वरील सायखेडा पुलावर बंदोबस्ताची पाहणी करत होते.गेल्या काही दिवसात होणाऱ्या सततच्या पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

त्याचवेळी पुलाच्या दुसऱ्या बाजूने ब्राम्हणवाडे ता निफाड येथील पल्लवी उर्फ ताई गोरख माळी वय २८ वर्षे आपला मुलगा नाव रोहित वय ५ वर्षे सह पळत आली.आणि मुलाला काखेत घेत मुलासह उडी मारणार तोच सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी महिलेकडे बघत उडी मारू नको म्हणत धाव घेतली.

त्याच वेळी पुलावर प्रवास करणारे अशपाक शेख,भाऊसाहेब ससाणे सद्दाम शेख हे थांबत महिला पोलीस कर्मचारी उर्मिला काठे यांच्या मदतीला येत तिला आस्थेने विचारपूस करत आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत तिचे मनपरिवर्तन केले.मूळची ब्राम्हणवाडे येथील असल्याचे सांगत कौटुंबिक समस्येतुन आत्महत्या करत होते असल्याचे सांगितले.

दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांच्यातील भाऊ जागा जागा होत महिलेसह मुलास नवीन कपडे देत खाऊ भेट दिला. दरम्यान महिलेच्या चेहऱ्यावर अनंत चतुर्दशी च्या दिवशी पी वाय कादरी यांच्या रुपात विघ्नहर्ता धावून आल्याचे जाणवले. दरम्यान सायखेडा पोलिसांच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे.

"या सायखेडा पोलिसांच्या रूपात खऱ्या विघ्नहर्ता अनुभवला गेलाय.त्यांच्या या कृतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच." - सिद्धार्थ वनारसे, माजी जिल्हा परिषद सदस्य

"सदरक्षणाय खलनिग्रनाय या ब्रीदवाक्यानुसार सायखेडा येथे माय लेक यांचे वाचवलेले प्राण नक्कीच कौतुकास्पद आहे." - सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT