Superintendent of Police Shahaji Umap esakal
नाशिक

Nashik News : गोपनीयरित्या मिळणार माहिती अन् अवैद्य धंद्यांना बसणार चाप

उत्तम गोसावी : सकाळ वृत्तसेवा

ओझर : नाशिक पोलीस अधिक्षक पदी शहाजी उमाप यांनी पदभार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांना रडारवर घेतले असल्याने अवैद्यधंदयांना चाप बसणार आहे ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवैध धंदे सर्रास सुरू होते.

स्थानिक नागरिकांनी तक्रारी करून तालुकास्तरावरील अधिकारी आणि स्थानिक प्रशासन जुमानत नव्हते. त्यामुळे आता नव्याने पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारलेले शहाजी उमाप यांनी संपूर्ण जिल्ह्यातील चित्र बदलत आहे. ग्रामीण भागातील जवळपास सर्वच अवैध धंदे हळू हळू बंद होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

अवैध दारू विक्री, जुगार आणि मटके बंद होत असल्याने अचानक बदलेले चित्र पाहून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अधिक्षकांनी घेतलेल्या पवित्र्याचे कौतुक होत आहे. (Police Take Strict Action Again Illegal Business police share helpline number to public for complaint Nashik News)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

नाशिक जिल्ह्यात रात्री दहा नंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद केली जात आहे. ग्रामीण भागात शिस्त लावण्याचे काम पोलीस अधिक्षकांनी हाती घेतले आहे. त्यातच अवैध प्रकारचे धंदे दिसून आल्यास नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अवैध धंद्याबाबत माहिती देण्यासाठी 6262256363 हा नंबर उपलब्ध करून दिला आहे. ह्या नंबर कोणीही अवैध धंद्याच्या संदर्भात तक्रार करू शकणार आहे, अवैध धंदयाची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

जिल्हयातील ठरवून दिलेले पन्नास पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास तक्रार केल्यास तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी म्हटले आहे.हेल्पलाइन नंबर जाहीर करत असतांना तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याने, तक्रारी प्राप्त होण्यास आणि कारवाई करण्यास अधिक सोपे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT