नाशिक

पोलिस अधिक्षकांच्या समक्ष तपास अंमलदारांची''शाळा''

CD
टुडे पान ३ : मेन फिचर (दोन्ही फोटो वापरावेत) NSK26H33452, NSK26H33451 जळगाव : कार्यशाळेत बोलताना जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे. सोबत ‘एटीएस’चे पोलिस अधीक्षक संभाजी कदम, अपर पोलिस अधीक्षक अशेाक नखाते, संदीप गावित आदी. --- तपास अंमलदारांची पोलिस अधीक्षकांसमोर ‘शाळा’ कार्यशाळेत अचूक तपासाचे तज्ज्ञांकडून धडे; दहशतवादविरोधी सज्जतेवर भर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२४ : जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी, तपास अंमलदारांसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गुन्ह्यांचा तपास अधिक अचूक व प्रभावी करणे, अंमली पदार्थ तस्करीला आळा घालणे, दहशतवादविरोधी सज्जता बळकट करणे आणि ताणतणावाच्या वातावरणातही संयम राखत कार्यक्षम पोलिसिंगचे धडे यावेळी वेगवेळ्या चार विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात जिल्‍हा पोलिस अधीक्षक कार्यालयात प्रभावी पोलिसिंगचे चार महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात उपस्थितांना मार्गदर्शनासह त्यांच्या शंकांचे निरसन आणि प्रश्नोत्तरे अशा स्वरुपात तासिका घेण्यात आल्या. तपासातील त्रुटी व उणिवा कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. सुनील चोरडिया यांनी गुन्ह्यांच्या तपासादरम्यान राहणाऱ्या त्रुटींवर मार्गदर्शन केले. पुराव्यांचे योग्य संकलन, साक्षीदारांचे जबाब, कायदेशीर तरतुदींचे कठोर पालन आणि आरोपपत्रातील उणिवा दूर करण्यावर त्यांनी भर दिला. नशाबंदी कायद्यांतर्गत तपास अंमली पदार्थांच्या विरोधातील कारवाई अधिक कडक करण्यासाठी बोदवड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी मार्गदर्शन केले. गाझियाबाद येथील प्रतिष्ठित अकादमीमधील पाच दिवसीय विशेष कार्यशाळेत घेतलेल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रहार, एटीबी व एटीसीचे कार्य दहशतवादविरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सुरक्षा यंत्रणेची सज्जता याविषयी दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक संभाजी कदम (पुणे) यांनी मार्गदर्शन केले. ''प्रहार'' उपक्रमाची अंमलबजावणी तसेच एटीबी आणि एटीसी यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चौकट पोलिसिंगमधील भावनिक बुद्धिमत्ता सततच्या तणावपूर्ण वातावरणात काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी ''भावनिक बुद्धिमत्ता'' हा महत्त्वाचा विषय ठरला. महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना याच विषयावर मार्गदर्शन करण्याचा दांडगा अनुभव असलेले जळगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी या सत्राचे नेतृत्व केले. पोलिस दलातील तणाव व्यवस्थापन, नागरिकांशी अधिक संवेदनशील संवाद, संघर्ष निवारण आणि संकटकाळात योग्य व संयमी निर्णय घेण्याचे कौशल्य त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT