नाशिक

प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प

CD
34452 (जुना आहे) निमगूळ (ता. धुळे) : प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करत प्रतिज्ञा घेताना विद्यार्थ्यांसह शिक्षक. -- निमगूळमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प -- फटाके टाळण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नागरिकांना आवाहन -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा उत्सव मानला जातो. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर निमगूळ (ता. धुळे) येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनच्या विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्याबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फटाक्यांच्या वाढत्या दुष्परिणामांवर माहिती देत फटाके टाळण्याचे आवाहन केले. प्राचार्य एस. एम. भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनफटाक्यांवर होणारा खर्च टाळून त्या वाचलेल्या पैशातून छान पुस्तके खरेदी करणे, खेळणी घेणे, नवीन छंद जोपासणे आणि गरजूंना मदत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. प्राचार्य भावसार, मुख्याध्यापक उमेश सांगळे, पी. पी. अहिराव, किशोर पिसे, सीमा दराडे, सी. एन. नगराळे, एस. व्ही. भदाने, ए. एन. साळुंखे, एम. एस. अहिरे, एम. एम. देसले, जी. डी. पाटील, सी. ए. पवार आणि पी. बी. साळी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT