Fire crackers esakal
नाशिक

Pollution in Diwali : फटाक्यांची आतषबाजी अन् प्रदूषणाची चिंता!

नरेश हाळणोर

नाशिक : कोरोनामुळे दोन वर्षे सणासुदीला जल्लोष करण्यावरील निर्बंध यंदा नसल्याने दीपोत्सवात जल्लोषाचे वातावरण आहे. फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह आहे. मात्र वातावरणातील बदलाचा फटका जागतिक पातळीवर गंभीर विषय ठरत असताना फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषणात भर पडत आहे. दुसरीकडे प्रशासनालाच फटाक्यांसंबंधी अधिसूचना जारी करण्याचा विसर पडला आहे.

बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. वाहन बाजारांसह कपडे, किराणा या बाजारपेठांमध्ये अलोट गर्दी आहे. नवीन कपडे, वाहने, गोड पदार्थांसह फटाक्यांना मागणी आहे. फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्येग ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची समस्या उभी ठाकली आहे.

वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक ऋतुमानासह अनेक पातळ्यांवर तीव्र स्वरूपाचे परिणाम होत आहेत. पावसाळा संपला, तरीही परतीचा पाऊस दाणादाण उडवत असल्याची परिस्थिती गेल्या काही दिवसांपर्यंत सारे जण उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. स्वाभाविकपणे प्रदूषणासारख्या गंभीर विषयांकडे लक्ष दिले जाणार की नाही, हा खरा प्रश्‍न आहे.

यंदा देशातील काही राज्यांमध्ये फटाके वाजविण्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये दीपावलीच्या दिवशी सायंकाळी दोन तासांची मुदत फटाके वाजविण्यासाठी देण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करत असताना गुन्हा दाखल करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. काही राज्यांमध्येही फटाके वाजविण्यावर वेळेची मर्यादा घालून दिली आहे. तसेच कर्कश व प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

शहर पोलिस आयुक्तालयास विसर

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातर्फे गेल्या काही वर्षांपासून दिवाळीपूर्वी फटाके वाजविण्यासंबंधीच्या नियमावलींची अधिसूचना जारी केली जाते. त्यात फटाके वाजविण्याबाबतचे नियम दिले जातात. तसेच कोणत्या प्रकारचे फटाके वाजवावेत, ध्वनी व वायुप्रदूषण टाळण्यासाठी कोणत्या प्रकारचे फटाके वापरावेत, याबाबतचा स्पष्ट उल्लेख अधिसूचनेत असतो. या नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती दिली जाते. यंदा मात्र शहर पोलिस आयुक्तालयास दिवाळीपर्व सुरू होऊनही फटाक्यांसंबंधीची अधिसूचना जारी करण्याचा विसर पडला आहे.

आनंदाला उधाण

लग्नसमारंभासह आनंदाच्या क्षणी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी दीपोत्सवात करत आनंद लुटण्यात येतो. लक्ष्मीपूजनाला कानठळ्या बसविणाऱ्या लडी मागून लडी फोडण्यात येतात. फुलझडी, फटाक्यांची माळ, रॉकेट फायर यासह विविध प्रकारचे फटाके वाजविले जातात. १४-१

फटाक्यांमुळे वायू-ध्वनिप्रदूषण

खराब स्थितीतील फटाक्‍यांची विक्री करण्यात येऊ नये. २५ ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे, ३.८ सेंटिमीटरपेक्षा अधिक लांबीचे व ॲटमबॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या फटाक्‍यांची व क्‍लोरेटचा समावेश असलेल्या फटाक्‍यांची विक्री करू नये. चिनी फटाक्‍यांची विक्री करण्यात येऊ नये. फुटफुटी अथवा तडतडी, मल्टिमिक्‍स, चिलपाल, चिडचिडिया, बटरफ्लाय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिवळ्या फॉस्फरसयुक्त विषारी फटाक्‍यांची विक्री करू नये. १८ वर्षांखालील मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय फटाक्‍यांची विक्री करू नये.

शांतता क्षेत्रात कोणत्याही फटाक्‍यांचा वापर करू नये. मनाई केलेले आपटबार व उखळी दारू उडविण्यास बंदी आहे. फटाक्‍यांची माळ दहा हजार फटाक्‍यांपेक्षा अधिक लांबीची असू नये. त्यावर बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या आवाजाच्या फटाक्‍यांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणाने जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश दिले.

निसर्ग अन् माणसांमध्ये शाश्‍वत नाते

शाश्वतम्, प्रकृति-मानव-सङ्गतम्,

सङ्गतं खलु शाश्वतम्।

तत्त्व-सर्वं धारकं

सत्त्व-पालन-कारकं

वारि-वायु-व्योम-वह्नि-ज्या-गतम्।

शाश्वतम्, प्रकृति-मानव-सङ्गतम्।।

अर्थात, निसर्ग आणि माणसामध्ये शाश्‍वत नाते आहे. पाणी, हवा, आकाशातील सर्व घटक, अग्नी आणि पृथ्वी हे सजीवांचे पालनकर्ता आहेत. हा संस्कृत श्‍लोक डोळ्यासमोर ठेवून सणासुदीचा उत्साह द्विगुणित करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT