crime news
crime news  esakal
नाशिक

Nashik Crime News : आईला अश्‍लिल Video पाठवणाऱ्या चुलत भावाचा भावानेच काढला काटा!

नरेश हाळणोर

नाशिक : देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावरील नागझिरा नाल्याजवळ गंभीर जखमी अवस्थेतील युवकाचा मंगळवारी (ता. ८) रात्री जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला. बेदम मारहाणीत त्याचा मृत्यु झाल्याचे समोर आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मयत युवक त्याच्या सख्ख्या चुलतीला मोबाईलवर अश्‍लिल मेसेजेस्‌ व व्हिडिओ पाठवित असे. त्याच कारणातून चुलत भावानेच मित्रांच्या मदतीने युवकाला बेदम मारहाण केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार असलेल्या मुख्य संशयितासह चौघांना अटक करण्यात आली असून, आठ-दहा जणांविरोधात देवळाली कॅम्प पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (porn video sending to an accused Cousin died after beating by cousin brother & friends nashik crime news)

गणेश पंजाबराव पठाडे (२५, रा. शिरमणी, जि. हिंगोली) असे संशयितांच्या मारहाणीत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अमोल अंबादास पठाडे (रा. विहितगाव, नाशिकरोड), दानिश रफिक शेख, सादिक अनिस शेख, विवेक गौतम केदारे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, अरमान सय्यद, अजय लोंढे, रिझवान शेख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश हा त्याचा चुलत भाऊ अमोल पठाडे याच्या आईला मोबाईलवर अश्‍लिल मेसेजेस्‌ व व्हिडिओ पाठवत असल्याने त्याचा राग तो मनात ठेवून होता. दरम्यान, मंगळवारी (ता. ८) सकाळी रेल्वेने गणेश त्याच्या बहिणीला देवळाली कॅम्प परिसरातील विजयनगर येथे सासरी सोडवायला आला होता. त्यानंतर गणेश घराबाहेर पडला. यावेळी संशयित अमोल पठाडे व त्याच्या आठ-दहा मित्रांनी गणेश यास नागझिरा नाल्याजवळ गाठले आणि त्यास जबर मारहाण केली.

त्यानंतर बेशुद्ध अवस्थेमध्ये गणेशला सोडून संशयितांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस घटनास्थळी पोहोचले. गणेशला उपचारासाठी छावणी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून गणेशला मयत घोषित केले.

गणेशच्या शरीरावरील बेदम मारहाणीच्या जखमा असल्याने सदरचा प्रकार खुनाचा असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. गणेशच्या बहिण प्रज्ञा कांबळे यांच्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. देवळाली कॅम्प व गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित अमोलसह चौघांना अटक केली. तर, पसार झालेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत आहे.

अमोल सराईत गुन्हेगार

सदर घटनेतील मुख्य संशयित अमोल पठाडे हा सराईत गुन्हेगार असून, उपनगर हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील तो संशयित आहे. तसेच, या गुन्ह्यातील त्यांच्या मित्रांचीही माहिती पोलीस घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT