positive family esakal
नाशिक

'Positive' दृष्टीने सावरले संपूर्ण कोरोना 'पॉझिटिव्ह' कुटुंब!

किरण सूर्यवंशी

अभोणा (जि.नाशिक) : संपूर्ण ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, (corona virus) कुठे ऑक्सिजनचा तुटवडा, (oxygen shortage) तर कुठे रेमडेसिव्हिरचा तुटवडा (redesivir shortage) अशा नकारात्मक वातावरणातही दह्याणे (पाळे) (ता. कळवण) येथील सोजाबाई पाटील (वय ८०) यांचा एचआरसीटी स्कोअर दहा असून, कुटुंबातील (family) सर्वजण पॉझिटिव्ह असतानाही सकारात्मक दृष्टिकोन व इच्छाशक्तीच्या जोरावर घरीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली.

सकारात्मक दृष्टीने सावरले संपूर्ण पॉझिटिव्ह कुटुंब

पती मुरलीधर पाटील, मुलगा कारभारी (बापू) पाटील (स्कोअर ६), सून रेखा पाटील (स्कोअर ७), नातू तेजस पाटील (स्कोअर ६) जवळपास सर्वच कुटुंब पॉझिटिव्ह असताना फक्त मुलगा कारभारी पाटील यांनी नाशिक येथील लीलावती रुग्णालयात उपचार घेतले. इतर सदस्यांनी मात्र घरीच विलगीकरणात राहून उपचार सुरू ठेवले. जिद्दीच्या जोरावर सोजाबाईंनी संपूर्ण कुटुंबाला आधार देत कोरोनाला परतावून लावले. कुटुंबाच्या कुटुंबच विलगीकरणात, कुणाशी संपर्क नाही, कुणाचा आधार नाही. सर्व नकारात्मक परिस्थितीतही सोजाबाईंनी आपला धीर खचू दिला नाही. इच्छाशक्ती असेल, तर कोणताही आजार जीवघेणा नाही. याचा आदर्श या ८० वर्षांच्या आजीने समाजासमोर ठेवला.

दह्याने येथील पाटील कुटुंबाची कोरोनावर मात

आपले आचार-विचार शुद्ध आणि सकारात्मक असले, की मन स्थिर राहते. प्रतिकारक्षमता वाढते. कोणत्याही आजारावर सहज मात करता येते. जे कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा आजारसुद्धा सहज बरा होतो. फक्त इच्छाशक्ती ठेवा व वेळच्यावेळी योग्य उपचार घ्या. - सोजाबाई पाटील, दह्याणे, बऱ्या झालेल्या रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT