rise in water level  esakal
नाशिक

Nandurbar: हतनूर, सुलवाडे धरणाच्या पाणीपातळीत वाढीची शक्यता; तापी नदीकाठीच्या नागरिकांना सतर्कतेसाठी आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : हतनूर धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येऊन दोन हजार २६० क्यूसेक व सुलवाडे धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटर उंचीने उघडून तीन हजार ८४७ क्यूसेक विसर्ग तापी नदीपात्रता सोडण्यात आला आहे.

त्यामुळे तापी नदीकाठावरच्या गावांतील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नयेत अथवा नदीपात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. (Possibility of rise in water level of Hatnoor Sulwade Dam Citizens along Tapi river called for vigilance nandurbar)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

९ जुलै २०२३ ला दुपारी बाराच्या सुमारास सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाची दोन द्वारे अर्धा मीटर उंचीने उघडून तीन हजार ८४७ क्यूसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

तापी नदीवरील पुराच्या पाण्याची शक्यता लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजच्या मध्यम प्रकल्पांतून पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पुढील २४ तासांत विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.

तापी नदीकाठावरच्या गावांतील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नयेत अथवा नदीपात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावेत, असेही निवासी उपजिल्हाधिकारी खांदे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT