नाशिक

शासकीय कार्यालयांत दिवाळीचा हॅंगओव्हर; शुकशुकाट कायम

CD
टुडे पान १, ॲंकर --- शासकीय कार्यालयांवरील दिवाळीचा अंमल उतरेना कामाचा वेग मंदावला; शुकशुकाट कायम; अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती तुरळक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : दिवाळीचा सण संपून काही दिवस उलटले असले, तरी शासकीय कार्यालयांमधील कामकाज अद्यापही पूर्वपदावर आलेले नाही. दिवाळीच्या सुट्या, त्यानंतर जोडून आलेल्या सुट्ट्या आणि सणानिमित्त बाहेरगावी गेलेले अधिकारी-कर्मचारी यामुळे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कार्यालयांमध्ये नागरिकांची वर्दळ कमी असून, काही विभागांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थितीही तुरळक असल्याने कामकाजाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या काळात शासकीय कार्यालयांना सुट्यांचे नियोजन असल्याने अनेक नागरिकांनी आपली महत्त्वाची कामे पुढे ढकलली होती. सण संपल्यानंतर कार्यालयांमध्ये नियमित कामकाज सुरू होईल, या अपेक्षेने नागरिक कार्यालयांकडे येत आहेत. मात्र, काही ठिकाणी संबंधित अधिकारी उपलब्ध नसणे, तर काही ठिकाणी कर्मचारी कमी संख्येने उपस्थित असल्याने नागरिकांना कामांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे दाखले, विविध प्रमाणपत्रे, अर्जांची पडताळणी, मंजुरी आणि इतर प्रशासकीय कामांचा निपटारा संथ गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय तसेच विविध शासकीय विभागांमध्ये नेहमीच्या तुलनेत नागरिकांची वर्दळ कमी असल्याचे चित्र आहे. काही कार्यालयांमध्ये मोजकेच कर्मचारी उपस्थित असल्याने कार्यालयीन परिसरात शांतता जाणवत आहे. नेहमी नागरिकांच्या गर्दीने गजबजणारे कक्ष, प्रतीक्षालये आणि कार्यालयाबाहेरील परिसर सध्या तुलनेने ओस पडलेले दिसत आहेत. नागरिकांच्या फेऱ्या दिवाळीपूर्वी प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी नागरिक आता शासकीय कार्यालयांमध्ये येत आहेत. मात्र, संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी जागेवर नसल्यास त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना विशेष गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवासाचा खर्च आणि वेळ खर्च करूनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. चौकट कामांचा वाढणार भार दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आधीच काही दिवस प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यात सणानंतरही कामकाजाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नसल्याने प्रलंबित अर्ज आणि फाईलींचा निपटारा करण्याचे आव्हान विभागांसमोर आहे. नियमित कामकाजाला गती मिळाल्यानंतर प्रलंबित कामांचा भार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयांमधील उपस्थिती आणि कामकाजाचा आढावा घेऊन नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच, दिवाळीचा उत्साह ओसरला असला तरी शासकीय कार्यालयांतील कामकाजावर त्याचा परिणाम अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. सणाचा हॅंगओव्हर संपून कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला उडवणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Pune Cyber Crime: बनावट अटक वॉरंट, व्हिडिओ कॉल आणि धमक्या; पुण्यातील वृद्ध महिलेची 32 लाखांची फसवणूक

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

SCROLL FOR NEXT