sahitya logo.jpg 
नाशिक

BREAKING : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलणार; लवकरच होणार अधिकृत घोषणा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  साहित्यिक आणि वाचकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निश्चित वेळेत होण्याची चिन्हे आता काही दिसत नाहीत. कारण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे साहित्य संमेलन पुढे ढकलणार असल्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्यामुळे हे संमेलन घेणे कितपत सुरक्षित आहे याबाबत बैठक पार पडल्याचे समजते. 

कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे, असा सूर साहित्यिक आणि नाशिककरांकडून येऊ लागला होता. बाहेरून येणाऱ्यांकडून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो याची शक्यताही नाकारता येत नव्हती. राज्यात सध्या मुंबई, पुणे, ठाणे आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यासाठी आयोजकांनी सावध भूमिका घेण्याचे ठरविले आहे. 

छगन भुजबळही कोरोनाग्रस्त

संमेलनाच्या स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना आठवडाभरापूर्वीच कोरोना झाल्याने ते उपचार घेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत संमेलनासंदर्भात घोषणा होणार नाही. त्यामुळे नाशिकमध्ये होणारे संमेलन आता पुढे ढकलणार असल्याची चर्चा सुरू आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष हजर नसतानाच हे संमेलन पुढे ढकलले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Robbery: पुण्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत? मध्यरा‍त्री बंगल्यात घुसून विंग कमांडरच्या तोंडावर हात ठेवला अन् धक्कादायक दरोडा!

​PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? जाणून घ्या सर्वात महत्वाची अपडेट

Latest Marathi News Live Updates : दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीमध्ये दमदार हजेरी

loan waiver: कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क: राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, सरकारला दिलेल्या आश्‍वासनाचा पडला विसर

Pune Municipal Corporation: आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित; दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप शिल्लक

SCROLL FOR NEXT