Bribe Crime News
Bribe Crime News esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : वीज कंपनीच्या लाचखोर सहायक अभियंत्याला कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : वीज मीटरवर वाढीव भार मंजूर करून देण्यासाठी वॉटर प्युरिफायर प्लांट चालकाकडून ४० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास जिल्हा न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. २६) कारवाई करीत लाचखोरास रंगेहाथ पकडले होते. (Power companys bribe taking assistant engineer arrested Nashik Crime news)

सचिन माणिकराव चव्हाण (४८, रा. शिवम हाइट्स, कृष्णवन कॉलनी, गोविंदनगर) असे या लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे. ४० वर्षीय तक्रारदाराला वॉटर प्यूरिफिकेशन प्लांटमध्ये सद्यःस्थितीत असणाऱ्या इलेक्ट्रिसिटी मीटरवर वाढीव लोड (भार) मंजूर करायचा होता.

तसा अर्ज त्यांनी चव्हाण यांना दिला होता. मात्र चव्हाण यांनी तो भार देण्याच्या मोबदल्यात २० तारखेला ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे व उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक अभिषेक पाटील, सहायक उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, पोलिस नाईक प्रणय इंगळे यांनी सापळा रचून चव्हाणला बुधवारी (ता. २६) रंगेहाथ अटक केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

लाचखोर चव्हाण यास गुरुवारी (ता.२७) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने लाचखोर चव्हाण यास एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, पथकाने लाचखोर चव्हाण यांच्या घराची झडती व तपासणी केली असता त्यात काहीही पथकाच्या हाती लागले नसल्याचे सांगण्यात आले. चव्हाण यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या घोटी व वैतरणा विभागात सहाय्यक अभियंता (वर्ग-२) या पदावर होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी मनसे, ठाकरे गटाचा अर्ज

SCROLL FOR NEXT