नाशिक

दारणा धरणाच्या आवर्तनासाठी ३ तालुक्यांत २२ तास वीजबंदी

CD
दारणा धरणाच्या आवर्तनासाठी ३ तालुक्यांत २२ तास वीजबंदी निफाड, सिन्नर, येवल्यातील ३५ गावांचा समावेश; १८ पासून महिनाभर आदेश लागू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१६ : रब्बी हंगामातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन सुरळीत करण्यासाठी दारणा धरणातून १८ नोव्हेंबरपासून पाणी आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचावे आणि अनधिकृत पाणी उपशाला आळा बसावा, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यांतील निश्चित गावांमध्ये कालव्यालगतच्या रोहित्रांचा दररोज २२ तास वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये सकाळी ६ ते ८ या दोन तासांच्या कालावधीतच वीजपुरवठा सुरू राहणार आहे. हा आदेश १८ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता तथा प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण आणि नाशिक पाटबंधारे विभागाच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. दारणा धरण ते नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यापर्यंतचा दारणा नदीचा पट्टा, गोदावरी नदी तसेच गोदावरी उजवा आणि डावा तट कालव्यातून पाणी घेणाऱ्या सर्व अनधिकृत उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठाही या कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निफाडमधील १९, सिन्नरमधील १२ गावांचा समावेश वीजपुरवठा खंडित ठेवण्याच्या आदेशात निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे, तामसवाडी, ब्राह्मणवाडा, तारुखेडले, खानगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, नांदूरमध्यमेश्वर, धारणगाव वीर, गाजरवाडी, धारणगाव खडक, कानळद, देवगाव, शिरवाडे, वाकद, धानोरे, नांदगाव, देहगाव आणि रुई या १९ गावांचा समावेश आहे. सिन्नर तालुक्यातील चोंढी, मेंढी, सांगवी, सोमठाणे, दहिवाडी, कोळगाव माळ, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, शहापूर, वारेगाव, कोळगाव थडी आणि हडेवाडी या १२ गावांमध्येही हा आदेश लागू राहील. तर येवला तालुक्यातील महालखेडा, निमगाव मठ, मुखेड आणि सत्यगाव या चार गावांचा समावेश आहे. पाणीवाटपात मनमानी केल्यास कारवाई आवर्तनातील सिंचन आणि पिण्याचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर सोपविण्यात आली आहे. निश्चित केलेल्या कालमर्यादेतच पाण्याचे वितरण करावे. निर्धारित कालावधीपेक्षा अधिक काळ आवर्तन सोडू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अनधिकृत पाणी उपसा होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित पाणी वापर संस्थांवरही टाकण्यात आली आहे. अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महावितरण, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, संबंधित तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रब्बी हंगामात पाण्याचे समान आणि नियोजनबद्ध वितरण व्हावे, शेवटच्या गावांतील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाणी मिळावे आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बाधित होऊ नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Sugars : सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी अखेर फुटली; शिवनेरी शुगर्सने ३९०० रुपये पहिली उचल जाहीर करताच स्वाभिमानीचे आंदोलन पाच दिवस स्थगित

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Latest Marathi News Update: सातारा रस्त्यावर उद्या वाहतूक बदल

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT