Power Supply
Power Supply esakal
नाशिक

तौक्ते चक्रीवादळानंतर नाशिक जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

विनोद बेदरकर

नाशिक : तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae cyclone) नाशिक व मालेगाव मंडळात महावितरणच्या यंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळल्यामुळे महावितरणची वीज यंत्रणा बंद पडली. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अविरत वीज यंत्रणा दुरुस्तीचे काम करताना बंद असलेल्या १८ उपकेंद्रांपैकी ११ उपकेंद्रांचा व इतर यंत्रणांचा वीजपुरवठा मंगळवारी सुरळीत केला. (Power supply in Nashik district restored after Tauktae cyclone)

तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला राज्यातील अनेक भागासह नाशिकलाही मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्र रूपामुळे जिल्ह्यातील १८ उपकेंद्रे, १६५ वाहिन्यांचा सात हजार २२९ रोहित्र आणि अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित होता आणि काही भागात सुरक्षेसाठी बंद करावा लागला. जरी वीज यंत्रणा बंद पडली तरी तत्काळ पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज राहून कोरोनाचे संकट असताना सुरक्षितपणे काळजी घेत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले. बंदपैकी ११ वीज उपकेंद्रे, १२३ वाहिन्यांचा, चार हजार ५६७ रोहित्रे आणि अनेक गावांचा वीजपुरवठा दुपारपर्यंत सुरू करीत कोलमडलेली यंत्रणा दुरुस्त करून तत्परतेने जिल्ह्यातील बहुसंख्य भाग लवकरच पूर्ववत केला आहे.

जिल्ह्यात व शहरात चक्रीवादळाच्या थैमानाने वीज यंत्रणेवर मोठा आघात केला. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. निसर्ग चक्रीवादळाचे रौद्र रूप बघता वादळ व पावसाने महावितरणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले. याशिवाय झाडांच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तसेच अनेक वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी स्पार्किंग होऊन वीजपुरवठा बंद पडला होता. फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार यांनी अविरत प्रयत्न केले. मात्र प्रचंड वाऱ्याच्या वेगामुळे दुरुस्ती कार्यात अडथळे निर्माण झाले. मात्र वाऱ्याचा वेग ओसरताच मंगळवारी दुपारपर्यंत शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले.

(Power supply in Nashik district restored after Tauktae cyclone)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT