Nashik Prabhu Shri Ram Festival : प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पुण्यभूमीत पर्यटन संचालनालयातर्फे शनिवारी (ता. १२) व रविवारी (ता. १३) प्रभू श्रीराम महोत्सव होणार आहे.
शनिवारी रामायण सर्किट सहल होणार असून, रविवारी चित्रकला स्पर्धा व ‘नादब्रह्म’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. (Prabhu Shri Ram Festival organized by Tourism Department in Nashik news)
नाशिकमध्ये धार्मिक पर्यटकांची संख्या विचारात घेऊन शनिवारी रामायण सर्किट सहल घडवण्यात येणार आहे. यात अंजनेरी, कावनई, टाकेद, तपोवन, काळाराम मंदिर, सीतागुंफा, रामकुंड या पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळांची सहल अवघ्या शंभर रुपयात घडेल.
त्यासाठी पर्यटन विभागाकडे नावनोंदणी करणे आवश्यक आहे. रविवारी गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांत चित्रकला स्पर्धा होणार आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी एकपर्यंत ही स्पर्धा होईल.
नावनोंदणीसाठी इच्छुकांनी ८१०८५८९८५६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पर्यटन विभागाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी केले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात सभागृहात ‘नादब्रह्म’ हा सांस्कृतिक महोत्सव होईल.
यात रामरक्षामंत्र पठण, भरतनाट्यम, कथक, रामायणातील प्रसंगांचे सादरीकरण, रामायण चित्रफीत, वाद्य व गायन सादरीकरण व चित्रकला स्पर्धेतील बक्षीस वितरण होणार आहे. महोत्सवात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.
भंडारदरा, आंबोली वर्षामहोत्सव
पावसाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन विभागातर्फे १२ ते १६ ऑगस्टदरम्यान भंडारदरा व आंबोली येथे वर्षामहोत्सव होणार आहे. यात महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी, वैभवशाली परंपरा आणि आदिवासी बांधवांचे दुर्लक्षित राहिलेले कलागुण बघायला मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.